लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांपासून एमआयडीसी, २७ गावांतील विविध रस्त्यांखाली जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे केल्यानंतर रस्त्यावरील ढीग ठेकेदाराकडून काढण्यात येत नाहीत. एमआयडीसीत पिंपळेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर असाच एक ढीग एक महिन्यापासून पडून आहे. उद्योजक, नागरिकांना त्रास होत आहे याची माहिती असूनही ठेकेदार, पालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने उद्योजक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
maharashtra assembly election 2024 prakash ambedkar alleges that travel in mumbai and electricity bills is expensive because of adani
मुंबईतली प्रवास, वीज अदानींमुळे महाग, वंचित’च्या प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण

रात्रीच्या वेळेत रस्त्यावरील हे ढीग झटकन लक्षात आले नाही तर दुचाकी स्वार, मालवाहू चालक या ढीगाला धडक देतो. अनेक अपघात या भागात घडतात, असे या भागातील उद्योजकांनी सांगितले. पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्यावर हा मातीचा ढीग आहे. अनेक कंपन्या या भागात आहेत. मालवाहू वाहने कंपन्यांमध्ये सतत येजा करत असतात. त्यांना या ढिगामुळे वळसा घेऊन कंपनीच्या ठिकाणी यावे लागते. स्थानिक उद्योजकांनी हे मातीचे ढीग हटविण्याची मागणी अधिकारी, ठेकेदारांकडे केली आहे. या मागणीकडे ठेकेदार लक्ष देत नसल्याचे या भागातील व्यापारी, उद्योजकांनी सांगितले.

हेही वाचा… कल्याण : मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना जन्मठेप; कल्याण जिल्हा न्यायालयाचा निकाल

शिळफाटा रस्त्याचा हा सेवा रस्ता आहे. बहुतांशी वाहने या रस्त्यावरून येजा करत असतात. त्यांनाही या मातीच्या ढीगाचा त्रास होतो. या मातीचा ढिगाचा आधार घेऊन अनेक वाहन चालक रस्त्याचा काही भाग वाहनतळ म्हणून वापर करतात. अनेक वेळा या अरुंद रस्त्यावर वाहन कोंडी होते, असे या भागातील व्यावसायिकांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसीचे अधिकारी नियमित या रस्त्यावरून येजा करतात. त्यांनाही हे ढीग दिसत नाहीत का, असे प्रश्न वाहन चालक करत आहेत.

हेही वाचा… ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट

मानपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहने वळसा घेऊन शिळफाटा रस्त्यावर जातात. काही वाहन चालक या सेवा रस्त्याचा वापर करतात. मातीच्या ढिगामुळे त्यांना अडथळ्याच्या शर्यतीला तोंड द्यावे लागते. पालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला वर्दळीच्या रस्त्यावरील मातीचा ढीग तातडीने हटविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उद्योजक, प्रवासी करत आहेत.