कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील हे महापालिका प्रशासनाचे आश्वासन यंदाही हवेत उरले असून या रस्त्यांच्या कामाच्या दिरंगाईबद्दल वाहतूक विभागाने महापालिकेस नोटीस धाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठेकेदारांना दिलेली मुदत टळून गेली तरीही ही कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे शहरात जागोजागी वाहतूककोंडी होत असून पावसाळय़ापूर्वी मुख्य रस्त्यांवरील कामे मार्गी लावा, अशा सूचना पोलिसांनी महापालिकेस केल्या होत्या. मात्र, या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात आल्याने वाहतूक पोलिसांनी महापालिकेला इंगा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण, डोंबिवली शहरात वाहतूक विभागाला विश्वासात न घेता अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खोदकामे करण्यात आली. शहरभर रस्त्यांची कामे सुरू करताना अवघ्या चार ठिकाणी यासंबंधीची परवानगी घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक विभागाने पालिकेला नोटिस पाठविली आहे.
मुदत संपली.. रस्त्यांची कामे सुरूच!
कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील हे महापालिका प्रशासनाचे आश्वासन यंदाही हवेत उरले असून या रस्त्यांच्या कामाच्या दिरंगाईबद्दल वाहतूक विभागाने महापालिकेस नोटीस
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-06-2015 at 01:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road works still pending in kalyan