सोमवारी सकाळी ठाकुर्ली येथील म्हसोबा चौकातून पायी जात असताना एका ८० वर्षाच्या वृध्द महिलेला दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी अडवून त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावून पळून गेले.श्रीदेवी म्हैसाळे (८०, रा. सर्वोदय हिल्स, म्हसोबा चौक, ठाकुर्ली) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. श्रीदेवी म्हैसाळे या सोमवारी सकाळी ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागातील रस्त्यावरुन हनुमान मंदिर मार्गे आपल्या घरी पायी चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दोन चोरट्यांनी श्रीदेवी या निरानगर, इंद्रप्रकाश सोसायटी जवळ येताच वेगाने दुचाकी त्यांच्या अंगावर नेली. चुकून दुचाकी अंगावर आली म्हणून त्या बाजुला झाल्या. दुचाकीचा एक टायर पायाला लागल्याने त्या पायाजवळ कळ आल्याने खाली वाकल्या. त्या वेळेत दुचाकीवर मागे बसलेल्या भामट्याने श्रीदेवी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली.

हेही वाचा >>> डोंबिवली : शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा २२ वा दिवस

माळेची साखळी भक्कम असल्याने ती पटकन तुटली नाही. चोरट्याने ती जोराने ओढल्याने श्रीदेवी यांच्या गळ्याला जखम झाली आहे.अनेक महिन्यांपासून म्हसोबा चौक भामटे, चोरटे, दरोडेखोर यांचा अड्डा झाला आहे. पोलिसांची नजर चुकवून भामटे या भागात फिरत असतात. पादचारी भेटला की त्याला लुटतात. याप्रकरणी श्रीदेवी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Story img Loader