अमुदान कंपनीपासून ५०० मीटर परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या निवाऱ्याखाली ३० ग्राहक दुपारच्या वेळेत भोजन करत होते. काही ग्राहकांच्या तयार भोजनाच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. मालक, सेवक भोजन वाढण्यात मग्न होते. अचानक हॉटेलचे छत कोसळून त्यात सिमेंट पत्र्याचे छत असलेल्या निवाऱ्याखाली ३० ग्राहक अडकून पडले. कोणाला काहीच कळले नाही.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
भूकंप झाला असेल या विचाराने हॉटेल मालक, सेवकांनी तातडीने ग्राहकांना निवाऱ्या खालून बाहेर काढले. काही जण जखमी झाले होते. त्यांचे भोजनाचे हात होते. जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवून दिले. ही धावाधाव करताना नंतर समजले की जवळील कंपनीत मोठा स्फोट होऊन त्या परिसराचे नुकसान झाले. सुरूवातीला आम्हाला हा भूकंप असल्याचे जाणवले. इतका भीषण हा स्फोट होता, अशी माहिती या हॉटेल मालकाने दिली.