कल्याण- कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील अनेक रिक्षा चालक भाडे नाकारत आहेत. वाढीव भाड्याची मागणी करत आहेत. प्रवाशांना वाढीव भाड्यासाठी रिक्षेतून खाली उतरवत आहेत. अशा बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी प्रवाशांनी कल्याण मधील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे कराव्यात, यासाठी ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी शहरातील रिक्षा वाहनतळांवर सेवा क्रमांकाचे फलक लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवलीतील लोकमान्य गुरुकुल शाळेतील विद्यार्थी झाले शेतकरी

कल्याण, डोंबिवली पूर्व पश्चिम रेल्वे स्थानक भागातील सर्वाधिक वर्दळीच्या रिक्षा वाहनतळांवर हे फलक लावण्यात आले आहेत. कोणत्याही रिक्षा चालकाने प्रवासी भाडे नाकारले, वाढीव भाडयाची मागणी केली, चालक गैरवर्तणूक करत असेल तर प्रवाशांनी तातडीने उपप्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केलेल्या ९४२३४४८८२४ या सेवा क्रमांकावर संबंधित रिक्षा चालकाच्या वाहन क्रमांकासह व्हाट्सप संदेशाव्दारे ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना माहिती पाठवावी. प्रवाशांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाणार आहे, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले.

कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व भागात रिक्षा चालकांची सर्वाधिक अरेरावी असल्याच्या तक्रारी ‘आरटीओ’ कार्यालयात आल्या आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील लालचौकी रिक्षा चालक मनमानी करुन भाडे नाकारणे, वाढीव भाडे आकारत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. या प्रकरणी दोन रिक्षा चालकांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील घोडेखोत आळीतील दक्षिणमुखी मारुती मंदिरात चोरी

रिक्षा वाहनतळावर रिक्षा चालकाने प्रवासी सांगेल त्या ठिकाणी प्रस्तावित भाड्याप्रमाणे प्रवास केला पाहिजे. परंतु, अनेक रिक्षा चालक मनासारखे भाडे मिळाले नाहीतर भाडे नाकारतात. प्रवासी इच्छुक ठिकाणचे वाढीव भाडे देत नसेल तर त्याच्या बरोबर वाद घालतात. त्याला अर्ध्या रस्त्यात उतरवतात. हे प्रकार कल्याण, डोंबिवलीत वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना बेशिस्त रिक्षा चालकांची तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हॉट्स क्रमांक उपलब्ध व्हावा म्हणून सेवा क्रमांक जाहीर केला आहे, असे साळवी यांनी सांगितले. प्रवाशांनी बेशिस्त वागणाऱ्या रिक्षा चालकाच्या वाहन क्रमांसह छायाचित्र ‘आरटीओ’च्या सेवा क्रमांक पाठविले की त्याची दखल अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. अशाप्रकारचे सेवा क्रमांक लावावेत म्हणून अनेक वर्षापासून प्रवाशांची मागणी होती.