कल्याण : कल्याण ते मुरबाड दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आठहून अधिक जीप चालकांवर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आयुर्मान संपलेली ही वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली. वाहनांची आयुर्मान क्षमता पंधरा वर्षाची असते. या जीप वाहनांचा कालावधी २० वर्षाचा झाला होता. त्यामुळे ही वाहने तोडमोड करून भंगारात काढली जातील, असे परिवहन अधिकारी बारकुल यांनी सांगितले.

कल्याण मधील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांना पत्र लिहिले होते. कल्याण ते मुरबाड दरम्यान १५ ते २० भंगार अवस्थेमधील जीप धावत असल्याचे निदर्शनास आणले होते. या जीपची आयुर्मान क्षमता संपली असताना ती वाहन चालक, मालकांकडून वापरली जात आहेत. ही जीप वाहने कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील महात्मा फुले चौक येथे वाहनतळाची जागा नसताना वर्दळीच्या रस्त्यावर उभी केली जात आहेत. या भागात नेहमी वाहतूक कोंडी होते. एसटी, केडीएमटी बसचे प्रवासी हे अवैध जीप चालक पळवित होते. शासनाचा महसूल बुडत असल्याचे, प्रामाणिक रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे रिक्षा संघटनेने पत्रात नमूद केले होते.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
dombivli donkey parking
डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
Pune Mumbai Expressway New Link Road to Cut from Pune to Mumbai
पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार

हेही वाचा…भिवंडीत बांगलादेशींना अटक

रिक्षेचे आयुर्मान पंधरा वर्षाचे झाले की भंगारात काढावी लागते. कल्याण ते मुरबाड धावणाऱ्या जीप १५ वर्षाहून अधिक काळाच्या झाल्यानंतरही वाहन चालकांकडून चालविल्या जात आहेत. या माध्यमातून ते पैसे कमवत आहेत. कल्याण शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी येऊन ते व्यवसाय करत आहेत. हे माहिती असुनही उपप्रादेशिक परिवहन विभाग त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असे प्रश्न रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष नवले, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सचिव विलास वैद्य यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे उपस्थित केले होते. येत्या आठ दिवसात भंगार जीपवर कारवाई झाली नाहीतर संघटनेने रिक्षा बंदचा इशारा दिला होता.

हेही वाचा…पलावातील व्यावसायिकाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

या तक्रारीची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण ते मुरबाड दरम्यान धावणाऱ्या जीप चालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांच्या उपस्थितीत कारवाई केली. जप्त केलेल्या सर्व जीप मुरबाड बस आगारात ठेवण्यात आल्या आहेत. कल्याण ते मुरबाड दरम्यान धावणाऱ्या आयुर्मान संपलेल्या आठ जीपवर कारवाई केली आहे. या जीप जप्त केल्या आहेत. त्या भंगारात काढण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. आशुतोष बारकुल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.

Story img Loader