लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ‘विकासाच्या सप्तरंगात विरोधकांनी सोबत यावे. विरोधी पक्षाकडे संख्याबळ नसले तरी त्यांना आम्ही कमजोर समजत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके आहेत,’ असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिंदे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महायुतीवर जनतेने मतांचा वर्षाव केला. त्यामुळे नागरिकांच्या जीवनात आम्ही आनंदाचे ‘सप्तरंग’ उधळण्याचे प्रयत्न करू, असे शिंदे म्हणाले. ‘भगवा’ रंग हा हिंदुत्त्वाचा आहे. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. ज्यांना भगव्या रंगाबरोबर यावेसे वाटत आहे, त्यांनी आमच्याबरोबर यावे. विकासाच्या सप्तरंगात विरोधकांनीही बरोबर यावे. विरोध पक्षाकडे संख्याबळ नसले तरी त्यांना आम्ही कमजोर समजत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके आहेत असे, ते म्हणाले.

धूलिवंदन साजरी करण्यापूर्वी गुरुवारी रात्री होळी निमित्ताने एकनाथ शिंदे हे कुटुंबाबरोबर ठाण्यातील वागळे इस्टेट येथील किसननगर भागात होळी दहन करण्यास उपस्थित होते. यानंतर शुक्रवारी त्यांनी कुटुंबियांबरोबरच कार्यकर्त्यांबरोबरही धुळवड साजरी केली.

Story img Loader