डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली उड्डाण पुला जवळील रेल्वे मैदाना जवळ रविवारी रात्री पावणे दहा वाजता एका धावत्या मोटीराला अचानक आग लागली. मोटारीच्या बोनेट मधून धूर बाहेर येऊ लागताच चालकाने वाहन थांबवून वाहनातून बाहेर पडणे पसंत केले. तेवढ्यात आगीचा भडका उडाला. त्यामुळे जीवित हानी टळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : बंजारा भवन, पोहरादेवी विकास आणि सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी सुट्टी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेली महिंद्रा एक्सएल मोटार रविवारी रात्री पावणे दहा वाजता ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन डोंबिवली पश्चिमेत रेल्वे मैदानाजवळून जात होती. ही मोटार गणेशनगर मधून पुढे जाणार होती. रेल्वे मैदानाजवळील पिंपळाच्या झाडा जवळ वाहन येताच चालकाला मोटारीच्या बोनेट मधून धूर येत असल्याचे दिसले. धूराचे प्रमाण वाढताच चालकाने तात्काळ वाहन थांबवून वाहनातून उतरणे पसंत केले. चालक वाहनातून उतरत असताना मोटारीने बोनेटच्या बाजुने पेट घेतला. मोटारीला चारही बाजुने आग लागली. यवेळी आपले कर्तव्य संपवून डोंबिवली वाहतूक विभागातील वाहतूक सेवक दिनकर सोमासे, राजाराम शिरोडे घरी चालले होते. त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तात्काळ पोलीस, अग्निशमन दलाला ही माहिती दिली.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी ; बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

रस्त्यामध्येच मोटारीला आग लागल्याने गणेशनगरकडून ठाकुर्ली पुलाकडे येणारी आणी ठाकुर्ली पुलाकडून गणेशनगरकडे जाणारी वाहने जागीच खोळंबून राहिली. त्यामुळे या भागात दोन्ही बाजुने वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सेवक सोमासे, शिरोडे यांनी तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजुला जाऊन वाहतूक रोखून धरली. गरीबाचापाडा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येताच त्यांनी मोटारीवर पाण्याचा मारा करुन आग विझवली. आग विझविल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अर्धा तास या भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शहराबाहेर असताना मोटारीला आग लागली. वाहन शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी नागरी वस्तीत असते तर अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Running carcaught fire in dombivli zws