“एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणे, कुणा बाबाचे नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं गेलं आहे. एखाद्या डॉनप्रमाणे आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे. त्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज हा ठाणे मनपाचे अधिकारी महेश आहेर यांचाच असल्याचा दावा देखील ऋता आव्हाड यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, मी विविध कामांच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलली आहे. त्यामुळे तो आवाज त्यांचाच असल्याची माझी खात्री आहे. इतके सर्व पुरावे हातात असताना आता पोलीस प्रशासन, कायदा-सुव्यवस्थेचे रखवाले काय करणार? असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला. काल सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ऋता आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केले.

ऋता आव्हाड म्हणाल्या की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा दिल्याबद्दल त्यांचे आभार. पण मुख्यमंत्री महोदय यांना मी सांगू इच्छिते की आता बस झालं. सर्वांना माहीत आहे की, महेश आहेर त्यांचे नाव घेऊन दहशत पसरवतात. मला देखील त्यांनी हे सांगितले, पण तेव्हा मी ते रेकॉर्ड केलं नाही. आहेर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या नावाने देखील दहशत पसरवली आहे. त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांचे जगणे देखील यांनी अवघड करुन ठेवलं आहे. पण जर वरचा माणूस जर आहेर यांच्यावर मेहेरबान असेल तर मग इतरांचं काय?”

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Former Khanpur legislator Kunwar Pranav Singh Champion.
भाजपाच्या माजी आमदाराला अटक, अपक्ष आमदाराला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Prakash Ambedkar slams Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar: “मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपाला…”, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप; म्हणाले…
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!

हे वाचा >> मनपा अधिकारी महेश आहेर हल्ला प्रकरण: जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

“आयुक्त म्हणून महेश आहेर यांची कारकिर्द किती देदीप्यमान आहे, हे पुढच्या काही दिवसांत सर्व लोकांसमोर येईलच. आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्यावर खूप आरोप केले. तरीही त्यांना सारखे वाचविले जाते. त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, हे आम्हाला माहीत नाही. ठाणे मनपातील ते एकटे असे अधिकारी नसून अशी बरीच उदाहरणे आहेत. ते आणि त्यांच्यासारखे जे अधिकारी आहेत, त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ”, अशी प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी दिली.

आता निकराची लढाई

आता फक्त आम्हाला सरंक्षण देऊ नका. पण सरंक्षण देण्यापेक्षा अशा अधिकाऱ्यांची बोलण्याची हिमंत कशी होते, ते पाहावे. अधिकारी स्वतः हे बोलतायत की, त्यांच्याकडून दुसरा कोणी वदवून घेतोय, हे पाहावे. तुम्हाला काय करायचे ते करा. आता आम्ही निकराची लढाई सुरु केली आहे. कारण आता माझ्या कुटुंबावर या सर्व गोष्टी आल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

मुंब्र्यातल्या आमच्या एका कार्यकर्त्याला फोन करुन सांगितले की, मी आव्हाड ठोकणार आणि पुढचा नंबर तुझा आहे. पण सामान्य लोकांना फोन रेकॉर्ड करण्याची सवय नसते. आम्ही त्याला विचारले की, तू फोन रेकॉर्ड केलास का? तर त्याने सांगितले एवढा मोठा अधिकारी असे बोलेल, याची मला जराही कल्पना नव्हती. एखादा गुन्हेगार असता तर त्याचा फोन नक्कीच रेकॉर्ड केला असता. हल्ली सर्वांना पुरावे हवे असतात. पुरावे दिले तरी ते काही फार तीर मारत नाहीत, असा आरोप ऋता आव्हाड यांनी केला.

Story img Loader