“एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणे, कुणा बाबाचे नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं गेलं आहे. एखाद्या डॉनप्रमाणे आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे. त्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज हा ठाणे मनपाचे अधिकारी महेश आहेर यांचाच असल्याचा दावा देखील ऋता आव्हाड यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, मी विविध कामांच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलली आहे. त्यामुळे तो आवाज त्यांचाच असल्याची माझी खात्री आहे. इतके सर्व पुरावे हातात असताना आता पोलीस प्रशासन, कायदा-सुव्यवस्थेचे रखवाले काय करणार? असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला. काल सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ऋता आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा