डोंबिवली- डोंबिवली पूर्व भागातील अंबिकानगर (प्रभाक. क्र.८२) प्रभागातील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवारपासून अंबिकानगर मधील साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्त्याकडे सरिता आईस फॅक्टरीमार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
हेही वाचा >>> कल्याण मध्ये शिवाजी चौकात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
याच कालावधीत मानपाडा रस्त्याने सरिता आईस फॅक्टरीमार्गे पाथर्ली भागाकडे येणारी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्ता सरिता आईस फॅक्टरी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्ते मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी पालिकेच्या फ प्रभागाच्या विभागाच्या उप अभियंत्याकडून वाहतूक विभागाला केली होती. वाहतूक विभागाचे उपायुक्त यांनी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अंबिकानगर मधील साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम आजपासून हाती घेण्यात येत असल्याने वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावर वळविण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून वाहन चालकांनी पाथर्ली येथील साईबाबा मंदिर चौक येथे डावीकडे वळण घेऊन एमआयडीसी रस्त्याने इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. रस्ता काँक्रीटीकरण काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे, असे गिते यांनी सांगितले.