डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा मानपाडा रस्त्यावरील साईबाबा चौक ते बुधाजी चौक (शिळ रस्ता) या दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गुरुवारपासून सुरू करण्यात आले. या कामासाठी साईबाबा चौक ते बुधाजी चौक रस्ता काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

हेही वाचा- ठाणे : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ६५ लाख रुपये नुकसान भरपाई

Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद

डोंबिवलीतील २७ गाव तसेच एमआयडीसीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे, बहुतांशी सर्वच रस्त्यांची काँक्रीटीकरणाची सुरु असलेली कामे, अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केलेली वाहने असे चित्र पर्यायी रस्त्यांवर दिसून येते. यामुळे डोंबिवलीतील वाहन चालक, प्रवासी पुन्हा वाहतूक कोंडीच्या भीतीने हवालदिल झाला आहे. मागील तीन वर्षापासून शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने कल्याण, डोंबिवली परिसरातील प्रवासी हैराण होते. गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्यावरील कोंडीतून मोकळा श्वास घेत नोकरदार प्रवास करत आहेत. आता मानपाडा रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्याने हे काम ठेकेदाराने विहित वेळेत करावे यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी रेटा लावावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील या रस्त्यावर ‘एमएमआरडीए’च्या २७ कोटीच्या निधीतून काँक्रीटीकरणाचे काम केले जात आहे.

हेही वाचा- भिवंडी : पोलिसांना चाकूचा धाक दाखवून अंमली पदार्थ तस्करांचा पळण्याचा प्रयत्न

पर्यायी रस्त्यांवर कामे

मानपाडा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने कोळसेवाडी वाहतूक विभागाने पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहन चालकांना केले आहे. पर्यायी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोटारी, ट्रक उभे करुन ठेवण्यात आले आहेत. एमआयडीसीतील बहुतांशी रस्त्यांवर एमएमआरडीएकडून कामे सुरू आहेत. या कामांमुळे कोंडी होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे. शिळफाटा परिसरात अनेक शाळा आहेत. डोंबिवलीतील अनेक विद्यार्थी शाळेच्या बसमधून जातात. रस्ता बंद मुळे सिंघवी गार्डन, सागाव भागातील मुलांना कोणत्या थांब्यावरुन बसमध्ये घ्यावे, असे प्रश्न शाळा चालकांना पडले आहेत. विनाअडथळा शहरात येण्याचा एकमेव मार्ग रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोर आहे. या रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढणार असल्याने कोंडी होणार नाही याची खबरदारी वाहतूक विभागाने घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

पर्यायी रस्त्यांवरुन सुरळीत वाहतूक होईल असे नियोजन केले आहे. वाहन चालकांनी मध्ये न शिरता मार्गिकेतून वाहने चालवावित. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

हेही वाचा- बदलापुरात अवकाळी पावसाची हजेरी; नोकरदारांची तारांबळ

रस्ते कामे होणे गरेजेचे आहे. परंतु, पर्यायी रस्ते अरुंद असून त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच दुतर्फा वाहने उभी केलेली आहेत. या रस्त्यांवर अवजड, शाळा बस, खासगी वाहने एकाच वेळी कशी धावणार, यासाठी रस्ते काम टप्प्याने हाती घेणे गरजेचे होते. सुरू झालेले काम लवकर पूर्ण करणे करणे गरजेचे आहे, असे मत विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- कल्याण: बिर्ला महाविद्यालय परिसरातून विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला

या टप्प्यातील नोकरदार, व्यावसायिक, शाळकरी मुलांनी आता अनेक महिने फक्त त्रास सहन करायचा का ? रस्ते काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ते सुस्थितीत करणे आवश्यक होते. तसे काही झाले नाही, अशी तक्रार सिंघवी गार्डन परिसरातील रहिवाशी राधिका राव यांनी केली आहे.