ठाणे : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा नऊ तास ठाण्यातील वेगवेगळ्या खाडी किनारी पोलीस शोध घेत होते. खाडी किनारी असलेल्या कांदळवनामध्ये कोल्हे तसेच हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे कांदळवनाच्या या जंगलामध्ये हा हल्लेखोर लपला असावा असा सुतरामही संशय पोलिसांना नव्हता. त्यामुळे खाडी किनारी भागात शोध घेणारे पोलीस कांदळवनाच्या जंगलाच्या दिशेने गेले नव्हते. मात्र, या हल्लेखोराने काही सेकंदासाठी आपला मोबाईल सुरू केला आणि पोलिसांना कांदळवनाच्या जंगालातील मानवी वावराच्या हालचाली दिसून आल्या. त्यानंतर हिरानंदानी इस्टेट परिसारातील दाट कांदळवनाच्या जंगलात शोध घेतला आणि हा हल्लेखोर सापडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे डोंबिवलीत निधन

हेही वाचा – Video : खाडी पुलांच्या दुभाजकाचा भाग कोसळला; मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव उड्डाण पुलावरील घटना

अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये शिरून एकाने चाकू हल्ला केला होता. मागील तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पथक हल्लेखोराचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याचा चेहरा हल्लेखोराशी मिळता-जुळता होता. परंतु तो आरोपी नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. त्यानंतर पुन्हा सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीमध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु छावणीमध्ये आढळून आला नाही. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो येथील कांदळवन परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कांदळवन भागामध्ये असलेल्या एका तरुणाची मदत घेतली. पंरतु हल्लेखोराने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याचा कांदळवनातील जंगलामध्ये शोध लागणे कठीण झाले होते. मध्यरात्री त्याने त्याचा मोबाईल काही वेळासाठी सुरू केला. त्यानंतर पोलिसांना त्याचा शोध लागला. त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्याला आता मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan case saif ali khan attacker was found in the forest of kandalvan thane ssb