लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात अंमली पदार्थाची खरेदी-विक्रि जोरात सुरु असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अंमली पदार्थांचा हा व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहीम राबवली जात असल्याने गेल्या ११ महिन्यात ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधून चार कोटी एक लाख ९४ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हा आकडा मोठा असला तरी प्रत्यक्षात याहून अधिक प्रमाणात या पदार्थांची तस्करी जिल्ह्यात सुरु असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
mumbai police (1)
पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही; विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्याचे ७ कोटी मात्र थकित!
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
Police sub-inspector arrested for taking bribe to avoid arrest
अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड
Eknath shinde
नियुक्ती प्रक्रियेत अधिकार नसताना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, आरोग्य विभागातील ६०० नियुक्त्यांना स्थगिती; मॅटच्या प्राधिकरणाचे ताशेरे
FDA raided establishments for adulteration seizing food stock worth Rs 311 crore
दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३ कोटी ११ लाखांचा माल जप्त

महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे. या समितीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एकूण ४ कोटी १ लाख ९४ हजार ७१८ रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या ७२३ गुन्ह्यांमध्ये एकूण ८५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. अमली पदार्थांच्या खरेदी- विक्रि, वाहतूक यासंबंधी करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्याविषयीची बैठक नुकतीच ठाणे पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्याच्या सूचना ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आणखी वाचा-कल्याण : वळण रस्त्यासाठी आधारवाडी कचराभूमीतील कचऱ्याचा ढीग हटविण्यास प्रारंभ

बंद रासायनिक कंपन्यांची पहाणी

ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात येणाऱ्या बंद रासायनिक कंपन्यांपैकी एकूण २७ बंद रासायनिक कंपन्यांची तपासणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी अन्न औषध प्रशासन, अधिकारी यांच्या मदतीने करण्यात आली आहे. तसेच इतरही रासायनिक कंपन्याची तपासणी करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या अंमली पदार्थ व्यसनग्रस्त रूग्णांकडून तेथील डॉक्टरांनी अंमली पदार्थाची विक्री व पुरवठाबाबत गोपनीय माहिती प्राप्त करून घेवून ती पोलिसांसोबत आदानप्रदान करावी. ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०५ व्यसनमुक्ती केंद्र असून त्यापैकी ०५ व्यसनमुक्ती केंद्रांना अंमली पदार्थ विरोधी पथक येथील अधिकरी व अंमलदार यांनी भेटी दिलेल्या आहेत. या भेटीदरम्यान अंमली पदार्थ विक्रीबाबत, पुरवठ्याबाबत माहिती घ्यावी व कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी बैठकीत देण्यात आल्या. ठाणे शहर आयुक्तालयातील गायमुख कासारवडली, कोलशेत कापूरबावडी, कोपरी आणि दूर्गाडी कल्याण येथील खाडी किनारी लक्ष ठेवावे अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.

०१ जानेवारी ते २८ नोव्हेंबर २०२३ मध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गांजा हाताळल्याबाबत ४३ केसेस दाखल झाल्या असून १ कोटी २३ लक्ष ५४ हजार १९३ रुपये किंमतीचा ७४१ किलो ८७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत यासोबत ५३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चरस हाताळल्याप्रकरणी ६ केसेस दाखल झाले असून ७२ लक्ष ७४ हजार रुपये किंमतीचा ८ किलो १८३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोकेन बाबतच्या २ केसेस दाखल झाले असून ५८ लक्ष ८० हजार रुपये किंमतीचा १४७ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले; तरुणाने पत्नीसह केली दोन मुलांची हत्या

मोफेड्रॉनबाबतच्या ३१ केसेस दाखल झाले असून ५४ लक्ष १९ हजार ८७० रुपये किंमतीचा १ किलो ८२० ग्रॅम ६ मि.ग्रॅ. मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. एलएसडी पेपर बाबतच्या १ लक्ष २० हजार रुपये किंमतीचा – २२ ग्रॅम वजनाचे एल.एस.डी १५ नग जप्त करण्यात आला आहे. इतर गोळ्या व सिरपबाबत ११ केसेस दाखल झाले असून ३५ लक्ष ८१ हजार ६९० रुपये किंमतीच्या १३ हजार ३५९ कफ सिरप बॉटल व ५०० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहे. आतापर्यंत यासोबत एकूण २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हेरॉईनबाबत १ केस दाखल झाले असून ६५ हजार रुपये किंमतीचे १३ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत यासोबत एकूण १ आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर सेवनार्थीच्या ६२९ केसेस दाखल करण्यात आल्या असून ७११ आरोपीस अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ४ कोटी १ लाख ९४ हजार ७१८ रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.