लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : गुटखा विक्री कायद्याने बंदी असताना येथील पश्चिमेतील देवी चौकातील एका किरणा दुकानदाराने आपल्या दुकानात विमल पान मसाल्याचा साठा करून त्याची विक्री केल्याबद्दल विष्णुनगर पोलिसांनी संबंधित दुकानदारा विरुध्द अन्न आणि सुरक्षा कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. दुकानदाराकडून ६९ हजाराचा पान मसल्याचा साठा जप्त केला आहे.

मनोज जगदशीप्रसाद गुप्ता (३५) असे आरोपी दुकानदाराचे नाव आहे. मनोज यांचे डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकातील राम मंदिराजवळ लक्ष्मी सोहम इमारतीत किराणा दुकान आहे. देवी चौकातील मनोज गुप्ता हा दुकानात विमल पान मसाला हा महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला मसाला विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दुकानावर पाळत ठेवली होती.

आणखी वाचा-कल्याण, डोंबिवलीत ९० तळीरामांवर कारवाई; मद्य पिऊन चालवित होते दुचाकी, मोटार कार

शुक्रवारी दुपारी विष्णुनगर पोलिसांनी अचानक गुप्ता याच्या दुकानात छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या दुकानात विक्रीसाठी प्रतिबंधित विमल पान मसाल्याचा ६९ हजार रूपये किमतीचा साठा आढळून आला. गुप्ता हा मसाला ग्राहकांना किरकोळ पध्दतीने विकत असल्याचे आढळले.

मानवी आरोग्यास घातक असा पान मसाला विक्री करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या पथकाने गुप्ता यांच्या दुकानावर छापा टाकला. विमल पान मसाल्याचा साठा जप्त केला. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार शिरीष शिर्के यांच्या तक्रारीवरून दुकानदारा मनोज गुप्ता यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यात अशाप्रकारे डोंबिवलीतील पाच ते सहा पान टपरी चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of vimal pan masala in grocery shop in dombivli case filed against shopkeeper in devi chowk mrj
Show comments