कल्याण – जमिनीची मालकी एका शेतकऱ्याची आणि त्या शेतीवर राबवतोय वर्षानुवर्षे दुसराच. कागदोपत्री जमीन नावावर नसताना वर्षानुवर्षे त्या जमिनीचा ताबा अन्य शेतकऱ्याकडे. अलीकडे जमिनीचे मोल वाढले आहे. भाव गगनाला भिडले आहेत. या जमिनींचा व्यवहार होत असताना गावोगावी शेतकऱ्यांमध्ये भांडण-तंटे होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘सलोखा योजना’ जाहीर केली असून ठाणे जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी सरसावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोन वर्षे सुरू राहणाऱ्या या योजनेत जमीन नावे असलेला आणि प्रत्यक्ष त्या जमिनीवर वर्षानुवर्षे आपली जमीन म्हणून राबणारा दुसरा शेतकरी यांनी सामंजस्याने पुढे येणे आवश्यक आहे. महसूल विभागातील चुकीच्या नोंदी किंवा पूर्वजांच्या व्यहारामुळे जमीन नावावर करून घेणे राहून गेले असल्यास जमीन नावे असलेला आणि प्रत्यक्ष कसणारा शेतकरी यांनी जमिनीच्या मालकी हक्काचा तंटा सोडविण्यासाठी पुढाकार घेतला तर तलाठी, सर्कल कार्यालय पातळीवर हे विषय मार्गी लागणार आहेत. हे जमीन व्यवहार नोंदणीकृत करून घेण्यासाठी एक हजार रुपये शेतकऱ्यांना नोंदणी शुल्क भरणा करावे लागणार आहे, असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये ठाण्यातील रिक्षा चालकांना गुंगीचे औषध देऊन लुटले

सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेत जमीन मालकीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षे असणे आवश्यक आहे. वाणीज्य, अकृषिक, निवासी घर वापरांच्या जमिनीसाठी ही योजना लागू नाही. शेत जमीन, माळ-वरकस जमिनीचा यामध्ये समावेश आहे. वर्षानुवर्ष जमीन वापर, वहिवाटीचा वाद असणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी सामंजस्याने हा वाद मिटविण्यास समंती दर्शवली की ते तलाठी कार्यालयात साध्या अर्जाने दोघांमधील जमीन विषयक वाद सहमतीने सोडविण्यासाठी तयार आहोत यासाठी पंचनामा करण्याची मागणी करू शकतात. तलाठी दोन सज्ञान व्यक्तिंना साक्षीला ठेऊन जमीन विषयक पंचनाम करतात. दोन्ही शेतकरी सहमतीने अदलाबदल झालेली जमीन एकमेकांच्या नावावर करण्यास किंवा वहिवाट सोडण्यास तयार आहेत, असा पंचनामा तलाठी करतो. हा पंचनामा मंडळ अधिकारी, तलाठी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन करतात. अदलाबदल झालेले गट क्रमांक, या जमिनीच्या लगतच्या शेतकऱ्यांचा सर्व्हे क्रमांक पंचनाम्यात उल्लेख केला जातो. शेतकऱ्याने तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसांत पंचनामा प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. हे पंचनामा प्रमाणपत्र दोन्ही शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दस्तास जोडणे आवश्यक आहे. या अदलाबदल जमिनीची दस्त नोंदणी करताना दोन्ही बाजूच्या वारस शेतकऱ्यांची सहमती असणे आवश्यक आहे. अशाप्रकारची सहमती नसेल तर दस्त नोंदणी अधिकृत होणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

जमीन वाद प्रकरणे

शेत जमिनीवरील वाद, बांधावरून येण्याचे वाद, मोजणीवरून वाद, अभिलेखातील चुकीच्या वारस नोंदी, भावांमधील जमीन वाटणीचे वाद वाढत जाऊन अनेक प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. हे वाद टाळणे, शेत जमीन विकास, जमीन वापरात सुसुत्रता येण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे, असे अधिकारी म्हणाला.

हेही वाचा – सौर उर्जा वापरात कल्याण-डोंबिवली पालिका देशात अव्वल, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांची माहिती

“वर्षानुवर्षे शेतकऱ्यांमध्ये आपसात जमीनविषयक असलेले मालकी हक्क, वहिवाटीचे वाद मार्गी लागावेत यासाठी सलोखा योजना राबविली जात आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.” असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग, डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले.