कल्याण – मालवण राजकोट येथील शिवरायाचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत असलेले येथील शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी आपटे यांच्या बंद दरवाजाला काळे फासण्यात आले. शिल्पकार आपटे यांच्या प्रतीमेवर शिवद्रोही लिहून ती भित्तीचित्रे आपटे यांच्या दरवाजावर झळकवली.

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिल्पकार आपटे यांना पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. जगाला अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास या पुतळ्याच्या कामात झालेला गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे काम या दोन मुख्य गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी निकृष्ट काम करून महाराजांना अपमान केला आहे, अशा शब्दात ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आपटे यांचा निषेध केला.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
What CM Eknath Shinde Said About Chhatrpati Shivaji Maharaj ?
Eknath Shinde : “छत्रपती शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार, पण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चर्चेत
Sculptor Jaydeep Apte Comment
Sculptor Jaydeep Apte: ‘घाणेरड्या राजकारणामुळे मी पोलिसांना शरण आलो’, शिल्पकार जयदीप आपटेचा दावा

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील २७ गावांमधील पथदिव्यांचे काम घेण्यासाठी राजकीय ठेकेदारांमध्ये चढाओढ

यावेळी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आपटे यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाजाला काळे फासले. दरवाजा काळाकुट्ट केला. पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग येथे जात आहे असे सांगून शिल्पकार जयदीप आपटे घरातून बाहेर पडले आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येते. त्यांचा मोबाईल बंद आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील आडीवली गावात इमारतीमधील दोन गटात राडा

पत्नीची चौकशी

शिल्पकार आपटे यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मालवण पोलीस गुरुवारी सकाळी कल्याणमध्ये दाखल झाले. बाजारपेठ पोलिसांच्या साहाय्याने त्यांनी आपटे यांचे घर पाहिले. तेथे टाळे होते. त्यांची पत्नी निशिगंधा ही सुरक्षिततेच्या दृष्टीने कल्याण मधील घरात न राहता माहेरी आपल्या आई, वडिलांच्या घरी राहण्यास गेली आहे. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा जबाब नोंदवला. मालवण येथील शिवरायांचा पुतळा उभारल्यानंतर आपटे यांचे कल्याण मधील विविध संस्थांनी त्यांचे कौतुक केले होते. कल्याणमधील खडकपाडा येथील स्वदेशी भारताचा संदेश देणारा सिंहाचा पुतळा शिल्पकार आपटे यांनी उभारला आहे.