भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात माती, वाळू उल्हास खाडीत वाहून आली आहे. खाडीतील खारफुटी, उंच पाषाण यांमध्ये वाळूमिश्रित माती अडून बसली आहे. ही माती गाळून त्यामधून वाळू काढण्याचे बेकायदा काम वाळू तस्करांनी कल्याण, डोंबिवली परिसरात सुरू केले आहे.

कल्याण तहसीलदारांनी गेल्या तीन वर्षांपासून उल्हास खाडीतील वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांचे वाळूचे हौद, बोटी उभे करण्याचे थांबे उद्ध्वस्त केले आहेत. सुरुवातीच्या काळात अश्विनी जोशी आणि मध्यंतरी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाची सूत्रे असताना उल्हास खाडीतील बेकायदा रेतीउपशाविरोधात जोरदार मोहीम त्यांनी सुरू केली होती. गेल्या वर्षभरातही कल्याण महसूल विभागाने कल्याण रेतीबंदर, डोंबिवली राजूनगर, रेतीबंदर, देवीचापाडा, कोपर भागातील रेतीचे अड्डे उद्ध्वस्त केले. तस्करांच्या बोटींची मोडतोड करून त्या खाडीत बुडवल्या. अलीकडे मुसळधार पाऊस सुरू असल्यापासून कोन, उंबर्डे, सापार्डे, कल्याण रेतीबंदर, देवीचापाडा, डोंबिवली रेतीबंदर, कोपर पट्टय़ांत १० ते १५ बोटी दिवस-रात्र खाडीतून बेकायदा वाळूउपसा करीत असल्याचे दिसून येत आहे. उपशाचे काम यांत्रिक (सक्शन पंप) पद्धतीने करण्यात येते. एका बोटीवर किमान चार ते पाच कामगार काम करताना दिसत आहेत. बोटीमध्ये वाळूचा पुरेसा साठा झाला की तात्काळ तो साठा दुसऱ्या बोटीने खाडी किनारच्या हौदात साठवण्यासाठी नेला जातो. हा साठा रात्रीतून विकासक, भूमाफियांना इमारत बांधकामासाठी विकला जातो.  कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या दरम्यान खारफुटीचा मोठा पट्टा आहे. हा माळरान पट्टा वाळूउपसा करून नष्ट करण्याचे काम तस्करांनी हाती घेतले आहे. हा पट्टा नष्ट झाला तर कोपर, मोठागाव पट्टा पुराच्या विळख्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

उल्हास खाडी किनारी नियमबा वाळूउपसा सुरू असेल तर तातडीने खाडीतील उपसा कोणत्या ठिकाणाहून केला जात आहे याची माहिती घेण्याचे आदेश नायब तहसीलदार अभिजीत खोले यांना देत आहोत. खोले, मंडल अधिकारी, तलाठी यांचे पथक हद्दीतील रेतीउपशाच्या ठिकाणांची पाहणी करतील. पोलीस बंदोबस्त घेऊन उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल.

– दीपक आकडे, तहसीलदार, कल्याण