वाळू उपशाला बंदी असतानाही चोरटी वाहतूक करणारे बारा ट्रक काशी मीरा येथे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीसांनी सात जणांना अटक केली आहे.
वाळूची बेकायदा वाहतूक करणारे दहा ट्रक दहिसर चेकनाका परिसरातील ठाकूर मॉलजवळ पकडण्यात आले व दोन ट्रक घोडबंदर खाडीजवळ जप्त करण्यात आले. या ट्रकमध्ये एकूण ५६ ब्रास रेती होती. बेकायदा वाळू काढून त्याची वाहतूक करण्याच्या गुन्ह्य़ाखाली सात जणांना पोलीसांनी अटक केली असून, अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
घोडबंदर नाक्यावरुन वाळू माफिया रात्रीच्या वाहतूक करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे.

Story img Loader