ठाणे : स्मार्ट सिटी योजनेमध्ये झालेल्या कामांबद्दल नागरिकांना काय वाटते, त्याचे या प्रक्रियेचे आकलन काय आहे आणि त्यांना बदल जाणवतो का हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत ‘नागरिक आकलन सर्वेक्षण-२०२२’ करण्यात येणार आहे. त्यात प्रभाग समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सहाय्यक आयुक्ताबरोबरच्या बैठकीत सांगितले.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
footpaths in Pune city will be audited here is the reason
शहरातील पदपथांचे लेखापरिक्षण करणार? काय आहे कारण
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

‘नागरिक आकलन सर्वेक्षण-२०२२’ मध्ये नागरिकांना नोंदवलेली मते, गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांनी संकलित केलेली माहिती आणि ठाणे महापालिकेने संकलित केलेली शहराशी निगडित ३७२ विषयांची माहिती यांचा अभ्यास करून नागरिकांचा शहराच्या नियोजनाचे धोरण ठरवण्यातील सहभाग वाढवण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली तयार होणार आहे. सध्या आता माहितीचे संकलन आणि प्रमाणीकरण करण्याचा टप्पा सुरू आहे. केंद्र सरकारद्वारे या माहितीची छाननी झाल्यावर ती नागरिकांसाठी खुली होईल. त्यामुळे या सर्वेक्षणाबद्दल नागरिकांना माहिती देणे, त्यांचा सहभाग वाढवणे ही जबाबदारी प्रत्येक प्रभाग समितीवर असल्याचे संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : समस्यांच्या विळख्यातील डोंबिवली गावाला दत्तक घ्या ; जागरुक नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावणे, शाळा, महाविद्यालये तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रचार मोहिमा राबवून नागरिकांचा सहभाग वाढविता येईल. त्याचप्रमाणे, कल्पकतेने वेगवेगळी अभियाने राबविणे, स्मार्ट सिटीमध्ये झालेल्या कामांची चित्रप्रदर्शने आयोजित करावीत, अशा सूचना संदीप माळवी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

Story img Loader