डोंबिवली – पूर्वीची डोंबिवली निवासी असलेली आता कांजुरमार्ग येथे कुटुंबीयांसह राहत असलेली सानिका विनोद चाळके हिची १९ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारताची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल आपल्या सर्व समर्थक, मार्गदर्शकांचे कौतुक करत सानिकाने मुलींच्या स्पर्धेतील वर्ल्ड कप जिंकूनच भारतात येऊ, असा विश्वास व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सानिकाचे वडील विनोद चाळके यांनी सांगितले, सुरुवातीला आम्ही डोंबिवलीत राहत होतो. सानिकाचे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. आता आम्ही कांजुरमार्ग येथे राहत आहोत. सानिकाच्या क्रिकेट वाटचालीविषयी विनोद चाळके यांनी सांगितले, वयाच्या दहाव्या वर्षापासून सानिका राहत्या घर परिसरात क्रिकेट खेळायची. तेव्हापासून तिला क्रिकेटची आवड निर्माण झाली. सानिकाची आवड विचारात घेऊन तिला क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले.

हेही वाचा >>>कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

क्रिकेट खेळातील विविध डावपेच तिने आत्मसात करून स्वतामधील कौशल्ये विकसित केली. समर्पित भावाने ती क्रिकेट खेळत होती. त्यामुळे तिची क्रिकेट मुंबई संघात यापूर्वी निवड झाली. १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील गटात ती खेळली. अल्प वयात तिने क्रिकेट खेळातील महत्वाचे डावपेच आत्मसात केले. आता ती मुंबई क्रिकेट संघात खेळत आहे. १९ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप टी २० क्रिकेट स्पर्धेत तिची भारताची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.

मुलुंड-नाहूर येथील सनरूफ क्रिकेट मैदानावर क्रिकेट मंत्र अकादमी येथे प्रशिक्षक स्वप्निल प्रधान, मनीष राव यांच्या मार्गदर्शनाखाली सानिका क्रिकेटचे अद्ययावत प्रशिक्षण घेत आहे. तेथेच सराव करत आहे. याशिवाय मुंबई संघात असल्याने तिथेही तिचा सराव सुरू असतो, असे वडील विनोद शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा >>>सुकामेव्याच्या थरांनी सजलेली नानकटाई, चॉकलेटची रेलचेल

सानिका घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सानिका डावखुरी फलंदाज आहे. फलंदाजीमध्ये ती निष्णांत आहे.

भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे आपले स्वप्न आहे. मुलींच्या वर्ल्ड कप टी २० क्रिकेट स्पर्धेत उपकर्णधारपदी निवड झाल्याबद्दल आपण आपल्या सर्व मार्गदर्शक, साथ देणाऱ्यांचे ऋणी आहोत. या स्पर्धेत आपण नक्कीच यश मिळवून येऊ.- सानिका चाळके क्रिकेटपटू.