ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणुक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंड मागे घेतले आहे. यामुळे बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या भेटीत निवडणूक प्रचाराबाबत चर्चा झाल्याचे सुत्रांकडून समजते. दरम्यान, दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचा दावा केळकर यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहर विधानसभा मतदार संघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने येथे संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. या मतदार संघातून शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे हे दोघे निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. या दोघांचे आणि केळकर यांचे विळा-भोपळ्यासारखे नाते आहे. यामुळेच केळकर यांना उमेदवारी जाहीर होताच, भोईर आणि मिनाक्षी शिंदे या दोघांनी अपक्ष निवडणुकीची तयारी सुरू केली होती. हे दोघेही निवडणुक लढविण्याच्या निर्णायावर ठाम होते. महायुतीतील बंडखोरीमुळे केळकर यांची डोकेदुखी वाढली होती.

हेही वाचा…फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश देताच, दोघांनी निवडणुक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली असून यामुळे संजय केळकर यांची डोकेदुखी कमी झाली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीमधील बंडोबांचे बंड थंडावताच, भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे हे उपस्थित होते. या मतदार संघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून या बैठकांचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीदरम्यान घेऊन निवडणुक प्रचार रणनितीबाबतही चर्चा केल्याचे सुत्रांकडून समजते.

हेही वाचा…भिवंडीत उद्धव सेनेच्या बंडखोराला काँग्रेस नेत्याची साथ

दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही. संजय केळकर भाजप उमेदवार, ठाणे शहर विधानसभा मतदार संघ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay bhoir and meenakshi shinde have withdrawn their rebellion after cm s orders sud 02