भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच रशियाने युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू केले आणि विद्यापीठात पाऊल न ठेवताच संकेतवर भारतात परतण्याची वेळ आली आहे. युक्रेनमधील भुको विनियान विद्यापीठात संकेत एमबीबीएसचा सहा वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणार होता. भारतात नीटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर येथील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च खूप असल्याने संकेतच्या वडिलांनी त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला पाठवण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी भारतापेक्षा कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येते, असे संकेतच्या वडिलांनी सांगितलं.

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!
pro max level backbencher student making bhelpuri while attending lecture video went viral
“मुलांनी तर हद्द केली राव!” वर्गात शिक्षक शिकवत होते अन् मागच्या बाकावर बसून विद्यार्थी करत होते ‘हे’ काम, Video Viral
Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Success Story Of Nitin Shakya In Marathi
Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट

२० वर्षाचा संकेत २३ फेब्रुवारीला मुंबईतून आई-वडिलांचा निरोप घेऊन युक्रेनला रवाना झाला. तो २४ फेब्रुवारीला संध्याकाळी युक्रेनला उतरला. निवासाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेळातच रशियाचे युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरू झाले. युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव नसल्याने संकेतसह जोडीदार घाबरले. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली भारतीय मुले मिळेल त्या विमानाने भारत सरकारने केलेल्या विमान वाहतूक सेवेतून परतली. परंतु परतीच्या यादीत क्रमांक न लागल्याने संकेत तिथेच अडकून पडला. सध्या त्याच्या जवळील पैसे संपले आहेत. खायला कुठे अन्न मिळत नाही. एटीएम बंद आहेत. फक्त एके ठिकाणी तो सुरक्षित आहे, अशी माहिती संकेतचे वडील प्राध्यापक गोकुळ पाटील यांनी दिली.

“विमान पकडण्यासाठी १० किमी पायपीट करावी लागणार”

रविवारी त्याचा नंबर भारतात येणाऱ्या विमान प्रवासासाठी लागला आहे. मात्र, भुको शहरात वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने विमान पकडण्यासाठी त्याला १० किलोमीटर युक्रेन सीमेवर येऊन मग तेथून पुढचा प्रवास करावा लागणार आहे. युक्रेनच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. २० हजार विद्यार्थी या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अतिशय नाजूक आणि खडतर परिस्थिती आहे, असे प्राध्यापक पाटील यांनी सांगितले.

“…तर मुलाला तिकडे पाठवले नसते”

भारत सरकारने कोणत्याही परिस्थितीत आवश्यक ते उपाय करून भारतीय मुलांना मायदेशात घेऊन यावे, अशी मागणी पाटील यांनी केली. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे असे अगोदरच भारत सरकारने जाहीर केले असते, तर मुलाला तिकडे पाठवले नसते असेही पाटील यांनी सांगितले. सतत बॉम्बस्फोट, गोळीबार आणि आगीमुळे विद्यार्थी घाबरून गेले आहेत. तिथे धीर द्यायला कोणी नाही. आपण भारतात राहून काही करू शकत नाही, अशी खंतही संकेतच्या वडिलांनी व्यक्त केली.

हेही वाचा : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

संकेतने डोंबिवलीतील साउथ इंडियन शाळेमध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे वडील दादर येथील ताराबाई अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्याची पत्नी गृहिणी आणि मुलगा इयत्ता पाचवीत शिकत आहे.