भाईंदर :-सरस्वतीची हत्या करणाऱ्या मनोज सानेची आज मानसिक तसेच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.पोलीस तपासात साने सहकार्य करत नसल्यामुळे हत्येचे मुळ कारण शोधण्याचे  मोठे आव्हान पोलिसांपूढे उभे राहिले आहे.

मीरा रोड येथे राहणाऱ्या सरस्वतीची हत्या करणारा तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने हा तपासात पोलिसांची वारंवार दिशाभूल करत आहे.सुरुवातीला सरस्वतीने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा दावा मनोज केला होता.मात्र बोरीवली येथील ओळखीच्या दुकानदाराकडून त्याने कीटकनाशक खरेदी केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे मनोज साने हा खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याने केलेल्या इतर दाव्याची पडताळणी करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> Mira Road Murder : “डेटिंग ॲपवर सक्रिय होता मनोज साने, सरस्वतीचा मोबाईलही…” पोलिसांनी दिली माहिती

म्हणून आज( मंगळवारी ) मनोजची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.यात तो  गंभीर आजाराने बाधित आहे का? शिवाय स्वतःला नपुसंक म्हणून घेणारा मनोज खरं बोलत आहे का,हे सिद्ध होईल.याशिवाय केलेल्या कृत्याबाबत त्याला पश्चाताप  वाटत नसल्यामुळे त्याची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी  मानसिक तपासणी देखील केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त जयवंत बजबळे यांनी दिली आहे.

आता पर्यत या प्रकरणात २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.तर सरस्वतीचा मोबाईल मनोजच वापरत असल्याचे त्याने कबूल केले आहे.परंतु सरस्वतीचा मृत्यू करण्यामागे कारण काय होते हे त्याने सांगितले नसल्यामुळे पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.

सरस्वतीला सामाजिक कार्याची आवड. सरस्वतीला लहान पणापासूनच सामाजिक कार्य करण्याची आवड होती.त्यामुळे अहमदनगरच्या आश्रम शाळेतुन मुंबई आल्यानंतर देखील बरेच वेळा आश्रम मध्ये जाऊन खाऊ वाटप करत होती.याशिवाय इतर काही आश्रम मध्ये जाऊन देखील तिने सेवा केली असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे.

Story img Loader