ठाणे : जखमी, आजारी प्राण्यांच्या उपचार- निवाऱ्यासाठी ठाण्यातील ‘सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन’ (कॅप) ही संस्था कार्यरत आहे. प्राण्यांसाठी सर्वसुविधांयुक्त पक्के निवारागृह उभारण्याचा संस्थेचा संकल्प असून, त्यास आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘कॅप’ने ठाणे शहरातल्या घोडबंदर येथील वाघबीळ गावात भाडेतत्वावर जागा घेऊन अडीच वर्षांपूर्वी प्राण्यांसाठी ‘फ्रीडम फार्म’ हे तात्पुरते निवारागृह सुरू केले आहे. या निवारागृहात सुरुवातीला ३० प्राण्यांचा सांभाळ करण्यात येत होता. कालांतराने त्यात वाढ झाली. सध्या या निवारागृहात ५५ प्राणी आहेत. त्यात २८ श्वान, १९ मांजरी, ४ गाढव, कोंबडय़ा, गाय आणि बैल आदींचा समावेश आहे.

संस्था प्रामुख्याने ठाणे परिसरात कार्यरत असली तरी जखमी, आजारी प्राण्यांवरील उपचार, निवाऱ्यासाठी संस्थेकडे राज्यभरातून मदत मागितली जाते. मात्र, सुसज्ज निवारागृहाअभावी या सर्व प्राण्यांना इथे आणून ठेवणे संस्थेला शक्य नाही. त्यामुळे इथे सुसज्ज निवारागृह सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

 वेगवेगळय़ा प्राण्यांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचा संस्थेचा विचार आहे. निवारागृहात प्राण्यांवर उपचार करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागही तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी संस्थेला दानशूर, प्राणीप्रेमींचे मदतीचे हात हवे आहेत़.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarva karyeshu sarvada 0 citizens for animal protection foundation zws 70
Show comments