लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : सर्जनशील विषय आणि नव रंगकर्मींची कल्पकता यांचा मेळ साधणारी लोकसत्ता ‘लोकांकिका’ या स्पर्धेच्या ठाणे विभागीय फेरीत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘कुक्कुर’ या एकांकिकेने बाजी मारत महाअंतिम फेरीत स्थान मिळवले. सलग तिसऱ्यांदा ठाणे विभागातून अंतिम फेरीत जाण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. या स्पर्धेत परिक्षक म्हणून काम पाहणारे सुप्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर यांनी उपस्थित रंगकर्मीं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाने खचून जाऊ नका असा सल्ला दिला.

South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Indian cricket team to play warm up match in Dubai ahead of Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?
Champions Trophy 2025 All Venues in Pakistan Lahore Rawalpindi Karachi Are Still Not Ready Tournament Could Shift to UAE
Champions Trophy: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता
Border-Gavaskar Trophy India defeat against Australia sport news
‘डब्ल्यूटीसी’तील आव्हानही संपुष्टात
India Disqualified From WTC Final After Defeating in Border Gavaskar Trophy Australia vs South Africa
WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना

यशाची चव चाखायची असेल तर अपयश येणे गरजेचे आहे. अनेक मोठ्या कलाकारांना सुरूवातील अपयश आले आणि त्यानंतर ते यशस्वी झाले. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका आणि यश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवा, असेही ते म्हणाले. ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात लोकसत्ता लोकांकिकेची ठाणे विभागीय फेरी शनिवारी पार पडली. सामाजिक विषयांना उत्तम कथेची साथ, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीताची जोड देत, ठाणे विभागीय फेरीत उत्कृष्ट एकांकिकांचे सादरीकरण रंगकर्मींना केले. या स्पर्धेतील रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा-कल्याण : दिडशे ते तीनशे मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना प्रभागस्तरावर मंजुरी

वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी, नव रंगकर्मींच्या प्रयोगशीलतेची जोड, उत्तम प्रकाश संयोजन, संगीत, नेपथ्यांचे मांडणी आणि मानवी भावभावनांचा मेळ साधत लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा २०२४ मोठ्या उत्साहात पार पडली. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘ कुक्कुर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या महाविद्यालयाने सलग तीन वर्षे दर्जेदार एकांकिका सादर करित तिसऱ्यांदा महाअंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या ‘ क्रॅक्स इन द मिरर’ या एकांकिकेने द्वितीय तर, सीके ठाकूर महाविद्यालयाच्या ‘ वेदना सातारकर – हजर सर’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत परिक्षक म्हणुन काम पाहणारे अभिनेते संजय नार्वेकर आणि लेखक नीरज शिरवईकर यांच्यासह लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणचे संदीप पाटील, ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

वैयक्तिक पारितोषिके

सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना श्याम चव्हाण(वेदना सातारकर – हजर सर), सर्वोत्कृष्ट संगीत अक्षय धांगट (कुक्कुर), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार सिद्धेश नांदलस्कर (कुक्कुर), सर्वोत्कृष्ट अभिनय रुचिता सावंत (क्रॅक्स इन द मिरर), परिन मोरे (वेदना सातारकर हजर सर), चैतन्य शिंपी (क्रॅक्स इन द मिरर), सर्वोत्कृष्ट लेखक प्रशांत मोरे (वेदना सातारकर हजर सर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अजय पाटील (कुक्कुर) यांनी पारितोषिके पटकावली.

आणखी वाचा-मुंबईसह ठाणे, भिवंडीत १४, १५ डिसेंबर रोजी १५ टक्के पाणीकपात

लोकसत्ता लोकांकिका हा फार उत्तम उपक्रम आहे. नविन प्रतिभा शोधून त्यांना नावारुपास आणण्याचे काम लोकसत्ता करत आहे. या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला येत्या काळात भरपूर प्रतिभावंत कलाकार मिळू शकतात. लोकसत्ताने लोकांकिका सारखे अनेक उपक्रम करावेत. ठाणे विभागीय अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकेचे सादरिकरण वैशिष्ट्यपूर्ण होते. मुलांना जे सुचले, ते त्यांच्या पद्धतीने मांडत होते. हे मांडताना त्यांनी कुठलीही भिती बाळगली नाही. प्रत्येक एकांकिकेत वेगळेपणा होता. या रंगकर्मी विद्यार्थ्यांना मी इतकच सांगेल जे काय कराल ते प्रमानिकपणे आणि मेहनतीने करा. आपल्यामध्ये जी प्रतिभा आहे, त्याच्यावर आणि स्वत:वर विश्वास ठेवा. -संजय नार्वेकर, अभिनेता

लोकसत्ता लोकांकिका फार महत्त्वाचा उपक्रम आहे. कारण, विद्यार्थी महाविद्यालय स्तरापासून आपली कला सादर करतात आणि पुढे यातूनच एक कलाकार निर्माण होतो. या उपक्रमामुळे केवळ कलाकारच नाही तर, प्रेक्षक सुद्धा निर्माण होत आहेत. या उपक्रमाची गुणवत्ता, प्रतिष्ठा जशी आहे तशी ठेऊन लोकसत्ता इतके वर्षे या उपक्रमाचे आयोजन करत आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. ठाणे विभागीय अंतिम फेरीत सादर झालेल्या पाचही एकांकिका वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. या सर्व एकांकिकेचे सादरिकरण उत्तम होते. एकांकिकेसाठी विषय निवडताना जितकी मेहनत घेतली जाते, तितकीच मेहनत त्या विषयाच्या खोलात जाण्यासाठी घ्यायला हवी. -नीरज शिरवईकर, लेखक

Story img Loader