|| किन्नरी जाधव, भाग्यश्री प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाताळच्या सुट्टय़ांच्या बदललेल्या वेळापत्रकाचा फटका
नाताळच्या सुट्टीत लहान मुलांसाठी खास असलेल्या बालनाटय़ांचे प्रयोग रोडावत असल्याचे चित्र यंदाच्या सुट्टीत दिसत आहे. नाताळच्या काळात मिळणाऱ्या सुट्टय़ा कमी झाल्याने बालनाटकांसाठी प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत बालनाटकांचे प्रमाण घटल्याचे निरीक्षण बालरंगभूमी अभ्यासकांनी नोंदवले आहे. यंदा ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील सर्व नाटय़गृहांत मिळून जेमतेम चार ते पाच बालनाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
पूर्वी शाळांना दिवाळीप्रमाणे नाताळचीही मोठी सुट्टी मिळत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतांश मुले पालकांसोबत बाहेरगावी जात असल्याने दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीत बालनाटकांचे प्रयोग मोठय़ा प्रमाणावर होत असत. अनेक पालक या काळात आपल्या मुलांना बालनाटय़ शिबिरांतही दाखल करत असत. मात्र गेल्या काही वर्षांत शाळांनी दिवाळी आणि नाताळच्या सुट्टय़ांचा कालावधी कमी केल्याने बालनाटके आयोजित करणेच कठीण बनले आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात अनेक शाळांमध्ये स्नेहसंमेलनेही असतात. त्यामुळे हे विद्यार्थी या स्नेहसंमेलनाच्या तयारीत गुंतलेले असतात. त्यामुळे बालनाटय़ाच्या तालमींसाठी लहान मुलांचा ओढा कमी असतो. पूर्वी शनिवार, रविवारीही बालनाटय़ाचे प्रयोग लावले जात होते. परंतु बालकलाकारांचा प्रतिसाद कमी झाल्याने हे प्रयोगही बंद करण्यात आल्याची माहिती बालरंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या राजू तुलालवार यांनी दिली. बच्चे कंपनीच्या ओळखीची असणारी छोटा भीम, मोठा राक्षस, चेटकीण यांसारख्या पात्रांच्या माध्यमातून समाजात कसे वागावे, समाजातील महत्त्वाची मूल्ये या विषयावर भर देत असल्याचे राजू तुलालवार यांनी सांगितले. मनोरंजन महत्त्वाचे असतेच पण त्याचसोबत नीतिमूल्यांची जाणीव करून देणारी बालनाटय़े रंगभूमीवर येणे महत्त्वाचे आहे. संतांची आठवण करून देणारी बालनाटय़ याचा प्रभाव लहान मुलांवर होत असल्याने अशा प्रकारची बालनाटय़े महत्त्वाची ठरतात असे बालरंगभूमी अभ्यासक अरुंधती भालेराव यांनी सांगितले.
प्रयोगांची संख्या रोडावली
दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात १० ते १५ नाटकांचे प्रयोग झाले होते. यंदा मात्र ही संख्या रोडावली असून चार बालनाटकेच सादर होणार आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मागील दोन वर्षांपूर्वी बालनाटय़ाचे तीन ते चार प्रयोग लावण्यात आले होते. आता मात्र ही संख्या एका प्रयोगावर आली आहे. तर वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहातही हीच परिस्थिती असून गेल्या दोन वर्षांपूर्वी काही स्थानिक संस्थांनी बालनाटय़े भरविली होती. मात्र या वर्षी येथे एकही बालनाटय़ाचे प्रयोग नसल्याचे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात येत आहे.