स्वतः खड्ड्यातील चिखलात बसून प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न

उल्हासनगरः कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुरू असलेल्या निष्काळजीपणाविरूद्ध गेल्याच महिन्यात नागरिकांनी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर रस्त्याच्या उभारणीचे काम निष्काळजीपणे सुरू असल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. याच मार्गावरील सेक्रेड हार्ट शाळेचा एक १४ वर्षीय विद्यार्थ्याचा रस्त्यावर घसरून अपघात झाल्याने तो जखमी झाला. या घटनेने व्यथित झालेल्या शाळेच्या संचालकांनी थेट याच रस्त्यातील खड्ड्यात झालेल्या चिखलात बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह ग्रामस्थांनाही प्रशासनाविरूद्ध आंदोलन केले.

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम प्रवासी आणि स्थानिकांसाठी जीवघेणे ठरते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था होती. पावसाळ्यात येते अनेक अपघात झाले. गेल्या वर्षात रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर येथे कंत्राटदार कंपनीच्या वतीने पुरेशी सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने अपघातांची संख्या वाढली होती. धुळ आणि खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले होते. कंत्राटदाराच्या वतीने वाहतूकीचे नियोजन केले नसल्याने वाहतूक कोंडी होत होती. गेल्या महिन्यात स्थानिकांनी याविरूद्ध चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क करून आंदोलकांची मनधरणी केली. त्यानंतर या रस्त्याचे काम दुसऱ्या कंत्राटदाराकडे देण्यात आले. मात्र त्यानंतरही रस्त्यापासून प्रवाशांना होणारा त्रास थांबलेला नाही.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात

हेही वाचा >>> डोंबिवलीत कौटुंबिक वादातून कामगाराचे लिंग छाटले

या मार्गावर असलेल्या सेक्रेड हार्ट शाळेतील एक विद्यार्थ्याचा नुकताच अपघात झाला. या अपघातात १४ वर्षीय हा विद्यार्थी जखमी झाला. रस्यावर झालेल्या चिखलात घसरून पडल्याने हा अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून अशा अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या या दुरावस्थेविरूद्ध खुद्द सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक अल्बिन एँथोनी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट त्या खड्ड्यात पडून आंदोलन केले. अल्बिन एँथोनी यांनी केलेल्या या आंदोलनात स्थानिक विवेक गंभीरराव, अश्विन भोईर, अशफाक शेख आणि इतर ग्रामस्थही सहभागी झाले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता

२२ जानेवारी काळा दिवस

रस्त्याच्या कामात होत असलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला आहे. त्याविरूद्ध गेल्या महिन्यात स्थानिकांनी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही परिस्थिती बदलली नसल्याने आता स्थानिकांनी २२ जानेवारी हा काळा दिवस पाळला जाणार असल्याचे घोषीत केले आहे.