ठाणे : महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतरही कित्येक दिवस पुस्तके दिली जात नसल्याचे प्रकार दरवर्षी समोर येत होते. यंदा मात्र नेमके उलट चित्र असून शाळा सुरू होण्यापुर्वीच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यास सुरूवात झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दृट्यामुळेच हे घडल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महापालिकेच्या शाळा गुरूवार, १५ जूनपासून सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यापुर्वीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सुचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. यानुसार शिक्षण विभागाने वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, समग्र शिक्षण अभियान अंतर्गत महापालिकेच्या दोन्ही शहरी साधन केंद्रांना पहिली ते आठवी इयत्तेची माध्यम निहाय नवीन रचनेची पाठ्यपुस्तके आणि नववीच्या पुस्तकांचे संच गेल्या आठवड्यात मिळाले. ही पुस्तके शहरी साधन केंद्रांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या समूह साधन केंद्रांना पाठवली असून तेथून शाळांना पुस्तके वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाठ्यपुस्तके मिळण्यास पात्र अशा एकूण ३२४ शाळा आहेत. त्यात महापालिकेच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये एकूण ६७ हजार ७२४ विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी ‘बालभारती’कडून दोन लाख ९९ हजार २८१ पुस्तके महापालिकेस मिळाली आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळेत २८ हजार ६९४ तर माध्यमिक शाळांमध्ये ४ हजार ९९ विद्यार्थी आहेत. पहिली ते आठवीसाठी नवीन रचनेची पुस्तके, तसेच, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्याना जुन्या रचनेची नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व विषयांसाठी एकच पुस्तक चार भागात तयार करण्यात आले आहे. या पाठ्यपुस्तकात ठळक नोंदी करण्यासाठी प्रत्येक धड्यानंतर कोरे पान ठेवण्यात आले आहे.  यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर ओझे काही प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे महापालिकेच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी अनुदान निश्चित करून देण्यात आले आहे. तसेच, बालवाडीतील विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा आणि पाणी बाटली खरेदीसाठी अनुदान निश्चित करून देण्यात आले आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या अनुदानाच्या मर्यादेत शैक्षणिक साहित्याची खरेदी करून त्याची देयके शाळांमध्ये सादर करावीत. ही देयके मुख्याध्यपकांमार्फत शिक्षण विभागाकडे आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर निश्चित केलेली अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येईल. ही रक्कम प्राधान्याने जलद देण्यात यावी, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी केल्या आहेत.