ठाणे – हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या मंगळवार, ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने तसे आदेश जारी केले आहेत.गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने ठाणे जिल्ह्यात शनिवारपासून हजेरी लावली आहे. रविवार आणि सोमवारी पावसाचा कायम होता. ठाणे शहरात मुसळधार तर पल्याडच्या शहरात पावसाची संततधार सुरू होती. हवामान विभागाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळांना उद्या सुटी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती…

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या मंगळवार, ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार ठाणे जिल्हा परिषदेने शाळा आणि महाविद्यालय सुट्टीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून या पार्श्वभुमीवर पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या आणि मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यातील पालिका प्रशासनाकडूनही अशा आदेशाचे पत्र काढण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools and colleges in thane district will have a holiday tomorrow amy
Show comments