डोंबिवली: वैज्ञानिक शोधांसाठी खूप पैसे लागतात हा भ्रम आहे. शोधांसाठी पैसा हे अधिष्ठान नाही. यासाठी गुणवत्ता आणि कल्पकता खूप महत्वाची आहे, असे प्रतिपादन जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी येथे केले. शालेय जीवनापासून विद्याथ्यांमधील कुतुहल जागे केले. त्यांच्या मधील गुणवत्ता, कल्पकता, कौशल्ये जागृत केली तर शाळांमध्ये भरणाऱ्या विज्ञान प्रदर्शनांमधून पुढील काळात चांगले शास्त्रज्ञ तयार होतील. नवनवीन शोध लागतील, असे डॉ. कोल्हटकर म्हणाले.

जनरल एज्युकेशन संस्थेच्या डोंबिवलीतील ब्लाॅसम शाळेत देवराज राका पुरस्कृत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र साळवी, प्रदीप गोसावी, संजय नलावडे, रवींद्र तामरस, प्रकाश आधटराव, प्राचार्या नीलजा पाटील उपस्थित होते. वीसहून अधिक विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

हेही वाचा >>> कल्याण येथील गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर दुधकर कुटुंबीयांचा प्राणघातक हल्ला

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौर उर्जा प्रकल्प, जलपुनर्भरण, अपारंपारिक उर्जा स्त्रोत, सेंद्रिय शेती असे अनेक प्रयोग सादर केले आहेत. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा विनाश पाहता अशा प्रयोगांची, स्त्रोतांची आता गरज आहे. आधुनिक जग हे याच स्त्रोतांवर यापुढील काळात चालणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिक उर्जा स्त्रोत यांचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे : दिव्यांग निधीचे तत्काळ वाटप करा अन्यथा फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरु, अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा इशारा

आर्यभट्ट, निकोला टेस्ला, सी. व्ही. रमन, लाॅर्ड एडिसन, भास्कराचार्य अशा अनेक शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी अनेक शोध लावले. त्यांच्या काळात अत्याधुनिक कोणतीही साधने, मुबलक पैसा, साधने नव्हती. तरी उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आपल्या कल्पकता, कौशल्ये आणि गुणवत्तेच्या जोरावर जगाला मार्गदर्शक ठरतील असे शोध लावले. चाळीसगाव सारख्या दुर्गम भागात राहून भास्कराचार्यांनी लिलावती सारखा महान ग्रंथ लिहिला. शोध कार्यासाठी पैसा हे अंतीम साधन नाही. गुणवत्ता, कौशल्य, कल्पनाशक्तीने आणि शोधक वृत्तीने आपण चांगले शोध कार्य करू शकतो, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले. विज्ञानाला विवेक, अध्यात्माची जोड दिली तर त्यामधून मोठे संशोधनाचे काम उभे राहू शकते. अशा कार्यातून चांगले शास्त्रज्ञ पुढे येतात, असे ते म्हणाले.

अलीकडच्या काळात सरकारी अन्य क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत आहेत. आता संशोधन कार्याला मोठा वाव आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कल्पकता जागृत ठेऊन शालेय जीवनापासून शोध कार्याकडे वळले पाहिजे. केवळ शाळेतील विज्ञान प्रयोगावर न थांबता आपल्या प्रयोगाला स्वामीत्व हक्क मिळतील का यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे उपाध्यक्ष साळवी यांनी सांगितले. प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांची माहिती सादरीकरणातून दिली.