राजकीय पक्षांच्या अधिकृत संकेतस्थळांवरही अद्याप हालचाल नाही

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Congress complains against BJP advertisement Election Commission explanation of inquiry Print politics news
भाजपच्या जाहिरातीविरोधात काँग्रेसची तक्रार; चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
maharashtra assembly election 2024, gadchiroli vidhan sabha candidate, armori, bjp
भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान, गडचिरोलीत उमेदवार बदलला, आरमोरीत अडचण

महापालिका निवडणुकीची घोषणा होऊन आठवडा उलटला असला तरी ठाण्यातील विविध राजकीय पक्षांच्या समाजमाध्यमांच्या आघाडीवर अद्याप शुकशुकाट दिसत असून एरवी माध्यमांद्वारे एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या शिवसेना-भाजपनेही सध्या ‘थांबा आणि वाट पहा’ असेच धोरण स्वीकारले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने समाजमाध्यमांद्वारे ‘से नो टू शिवसेना’ ही आक्रमक मोहीम राबवली होती. ठाण्यात मात्र भाजपचे नेते चाचपडताना दिसत असून त्याचे प्रतििबब त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही उमटले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला होता. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांनी या माध्यमांचा वापरासाठी तज्ज्ञांच्या नेमणुका करण्यास सुरुवात केली असून काही पक्षांनी तर खास वॉर रुम तयार केल्या आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आक्रमक संघटनेला टक्कर देण्यासाठी भाजपने समाजमाध्यमांची हाताळणी करणारी मोठी टीम मैदानात उतरवली होती.

ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने कल्याण- डोंबिवलीतील बकाल अवस्थेचे चित्रण माध्यमांद्वारे रंगविण्यास सुरुवात केली होती. सत्ताधारी शिवसेना अडचणीत येईल, अशा पद्धतीने हा प्रचार केला जात होता. तसेच से नोट टू शिवसेना ही मोहीम तर त्या वेळी भलतीच गाजली होती.

ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना कल्याण- डोंबिवलीतील समाजमाध्यम युद्धाच्या आठवणी पुन्हा एकदा युतीच्या गोटात काढल्या जात असल्या तरी युतीची बोलणी अद्याप ठोस वळणावर नसल्याने दोन्ही पक्षांनी यासंबंधी आस्ते कदम धोरण स्वीकारले आहे.

शिवेसनाही मंदावली..

शिवसेनेच्या ठाण्याच्या अधिकृत पानावर निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अद्याप कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे एरवी समाजमाध्यमांवरही आपल्या आक्रमकतेचा झेंडा फडकाविणारी ही मंडळीसुद्धा युती होणार की नाही याबाबत संभ्रमित आहे. अधिकृतरीत्या कोणतेही पाऊल उचलले नसले तरी शिवसैनिकांनी एकला चलो रेची भूमिका समाजमाध्यमातून स्पष्ट होताना दिसून येते.

जुन्याच नोंदी..

समाजमाध्यमांवर एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्साह अचानक मावळल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या अधिकृत संकेतस्थळांवर तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसांची छायाचित्रे टाकण्यात आली आहेत. निवडणूक एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. तरीही नेटकरी मंडळी हालचालींविना आहेत. समाजमाध्यम हे केंद्र आणि राज्यात भाजप साह्य़कारी ठरले होते; मात्र पालिका निवडणुकांत भाजपच्या ‘बीजेपी फॉर ठाणे’ या पानावर अद्याप कोणतीही ठोस माहिती वा निवडणूक प्रचार सुरू झालेला नाही. या संदर्भात भाजपचे ठाणे शहर जिल्हा समाजमाध्यमा संयोजक राजू सिंह यांनी सध्या राज्यात युतीचे सरकार आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांवर टीका करणे टाळत असल्याचे स्पष्ट केले.