ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात रंगलेल्या वादात आता भाजपनेही उडी घेतली आहे. सुरुवातीला भाजपचे पदाधिकारी सावध भुमिका घेऊन या वादापासून अलिप्त राहिल्याचे चित्र होते. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केल्यानंतर त्यास समाजमाध्यमातून प्रतिउत्तर देण्याचे ठरवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टिकेला प्रतिउत्तर देणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली. असे असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
ubt leader aditya thackeray in loksatta loksamvad event for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका
pm modi rally Kharghar
खारघर मोदीमय! भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केली. यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून आरोपप्रत्यारोप सुरु झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.  शिवसेनेचा (शिंदे गट) मित्र पक्ष असलेल्या भाजपचे ठाण्यातील नेते सावध भुमिका घेऊन या वादापासून काहीसे अलिप्त राहिल्याचे सुरुवातीला चित्र होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांच्यावर टिका केली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत आयरे गावमध्ये तलाव बुजवून बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफियांकडून १५० चाळींचे नियोजन

राज्याला फडसुत गृहमंत्री लाभला आहे, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केल्यानंतर भाजपने या वादात उडी घेतली. महिलेचे प्रकरण असल्यामुळे भाजप नेत्यांनी सावध भुमिका घेऊन केवळ फडणवीस यांच्यावर झालेल्या टिकेला समाजमाध्यमातून प्रतिउत्तर देण्याचे ठरविले आणि त्यानुसार भाजप नेत्यांकडून विविध पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली. असे असतानाच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात नौपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी रोशनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाघुले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने भाजपचे पदाधिकारी चक्रावले असून त्यांच्यात यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु असल्याचे चित्र आहेत. या संदर्भात भाजपचा एकही पदाधिकारी प्रतिक्रीया देण्यास तयार नव्हता.

काय आहे तक्रार

फेसबुकवर भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षाची बदनामी करणारी पोस्ट टाकली असल्याचे मला काही कार्यकत्यां कडून समजले. त्यामुळे माझ्या मोबाईलमधील फेसबुक पाहिले असता, त्यामधील रोशनी शिंदे पवार नावाने अकाउंट असलेल्या पोस्टमध्ये “चोराला चोर म्हटल्यावर कारवाई होत असेल तर आजपासून चोराला #भा.ज.पा. नेता म्हणायचं.” असा वादग्रस्त उल्लेख केला असल्याचे पाहीले. ठाण्यातील रोशनी शिंदे पवार यांनी संबंधीत पोस्ट २५ मार्च रोजी टाकल्याचे निदर्शनास आले. त्या उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी असल्याचे त्यांच्या फेसबुक प्रोफाईल वरून स्पष्ट झाले. या प्रकरणी आमच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिकाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. ही पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित करून भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाची बदनामी केली आहे. त्याच बरोबर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे  संजय वाघुले यांनी तक्रारीत म्हटले आहे.