लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोदरेज पार्क भागात एक गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात आपण गुंतवणूक केली तर आपणास दुप्पट परतावा मिळेल किंवा पैशाच्या बदल्यात त्या गृहप्रकल्पात चार सदनिका देऊ, असे आश्वासन डोंबिवलीतील विकासक आणि एका सनदी लेखापालाने घाटकोपर पंतनगरमधील एका ७४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला सहा वर्षापूर्वी दिले. दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ज्येष्ठ नागरिकाने या प्रकल्पात एक कोटी २९ लाख रूपये गुंतवणूक केले. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नागरिकाला वाढीव परतावा नाहीच, पण गृहप्रकल्पातील सदनिका देण्यास आरोपींनी नकार दिल्याने ज्येष्ठ नागरिकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली आहे.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

अश्विन रजनीकांत शहा असे तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सनदी लेखापाल हरिश सत्रा, विकासक संतोष पांडे अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. ते डोंबिवलीतील रहिवासी आहेत. फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

आणखी वाचा-भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; तणावाचे वातावरण, पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी सनदी लेखापाल हरिश सत्रा, ओमसाई कन्स्ट्रक्शचे विकासक संतोष पांडे यांनी तक्रारदार अश्विन शहा आणि त्यांची पत्नी सुनिता यांना विश्वासात घेतले. त्यांना भोजनासाठी कल्याणमधील खडकपाडा भागातील गुरुदेव एनएक्स हॉटेलमध्ये भोजनासाठी नेले. आरोपींनी शहा यांच्या सोबत भोजन घेत असताना अश्विन शहा, त्यांची पत्नी सुनिता यांना आम्ही गोदरेज पार्क येथे जय गुरूदेव नावाने सात माळ्याचा एक गृहप्रकल्प उभारत आहोत. हा प्रकल्प उभारणीसाठी आम्हाला पैशाची अडचण आहे. आपण या गृहप्रकल्पात पैसे गुंतवले तर आम्ही तुम्हाला या प्रकल्पात भागीदार करून घेऊ. किंवा तुम्हाला या प्रकल्पातील चार सदनिका देऊ. या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार शहा यांनी एक कोटी १० लाखाचे धनादेश विकासक संतोष पांडे यांना लिहून दिले. १९ लाखाची रोख रक्कम सनदी लेखापाल सत्रा यांना दिली.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ

पाच वर्ष उलटून गेल्याने अश्विन शहा यांनी आरोपींकडे गुंतवणूक रकमेवरील वाढीव परतावा किंवा गृहप्रकल्पात चार सदनिका देण्याची मागणी सुरू केली. आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. अश्विन यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून आरोपींनी अश्विन यांना, आम्ही तुला पैसे परत करणार नाही. तुला एकही सदनिका मिळणार नाही. तुला काय करायचे ते कर. आम्ही कुणालाही घाबरत नाही, असे बोलून धमकी दिली. आपले पैसे आरोपींनी स्वतःच्या फायद्याकरिता वापरून आपली फसवणूक केली म्हणून अश्विन शहा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. घस्ते याप्रकरणाचा तपास करत आहेत.