लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी गेलेल्या ८१ वर्षीय महिलेला भरधाव रिक्षाने धडक बसली. या अपघातात वृद्धा जखमी झाली असून त्यांचा अस्थिभंग झाला आहे. अपघाताप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किसननगर येथे वृद्धा कुटुंबियांसोबत राहते. सोमवारी सकाळी त्या ठाणे महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी गेल्या होत्या. तपासणी करून घरी परतत होत्या. येथील एस.जी. बर्वे मार्ग परिसरात रस्ता ओलांडताना एका भरधाव रिक्षाची त्यांना धडक बसली. या धडकेत त्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागून दुखापत झाली.

आणखी वाचा-डोंबिवलीत पत्नीला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

परिसरातील रहिवाशांनी रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो भरधाव रिक्षा नेत तेथून निघून गेला. नागरिकांनी वृद्धेला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात त्यांचा अस्थिभंग झाला असून डोक्यालाही जबर मार लागला आहे. अपघाता प्रकरणी वृद्धेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizen women hit by rickshaw while went to hospital for check up mrj