tvlog032वयाची साठ वर्षे पूर्ण झाली की व्यक्ती ज्येष्ठ नागरिक होतो. केंद्र व राज्य सरकार अशाच नागरिकांना ज्येष्ठ नागरिक मानते, तसा सरकारी नियमच आहे. मात्र राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या राज्य परिवहन मंडळाला (एसटी) बहुधा हे माहीत नसावे. त्यांच्या लेखी वयाची ६५ वष्रे पूर्ण झालेली व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहे, तो त्यांचा अंतर्गत नियम आहे. त्यामुळे पात्र असूनही ज्येष्ठ नागरिक पाच वर्षे सवलतीपासून वंचित राहतात.  आतापर्यंत अशा प्रकारच्या सवलतीसाठी शासनाकडून दिल्या जाणारे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य़ धरले जात होते. आता ओळखपत्राऐवजी आधार कार्डाचा पुरावा एसटीवाले मागू लागले आहेत. त्याचे कारण विचारल्यास ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रे बोगस असतात, असे कारण दिले जाते. भविष्यात कदाचित हे जन्मतारखेचा पुरावा म्हणून चक्क दाखलाही आणण्यास सांगतील. वास्तविक ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या सामायिक असावी. ती साठ ती पासष्ठ ते एकदा ठरवावे.