डराने धमकानेवाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जिसकी आहट से डर जाते थे
भ्रष्ट नेतागण हमारे
उनके नाम भर से खौफ खाते थे
ऐसे दबंग सिपाही को थाने से, छीन लिया क्यों गया?
आखिर प्रमोशन के नाम पर, ट्रांसफर किया क्यों गया?
कामचोर और आलसी
न उन्हें फूटी आँख सुहाते थे
रिश्वतखोर सभी सिपाही
अब सिर्फ पगार के पैसे पाते थे
सुशासन के सपने को इतने जल्दी, उजाडम् दिया क्यों गया?

उनके डंडे के आगे
न कभी आँख उठा पाए दंगाई
उन्ही की ही बदौलत
ठाणे शांति की नींद सो पाई
थानेकर की आँखों में धूल, झोंक दिया क्यों गया?

आम और खास का
जिसने फर्क था मिटाया
कानून का पालन करना
दोनों को सख्ती से सिखाया
कानून के रखवाले को, ठाणे से दूर कर दिया क्यों गया?
आखिर प्रमोशन के नाम पर ट्रांसफर किया क्यों गया?
अव्यवस्था के अँधेरे में
जिसने ईमानदारी की ज्योत जलाई
आशावान अफसरों में भी
बदलाव की एक उम्मीद थी जगाई
ईमानदारी की उस इमारत को, धराशायी कर दिया क्यों गया?

नेता हो या अभिनेता
या फिर कोई भी रसूखदार
बेखौफ चलाते थे उन पर
कानून के कलम की हथियार
राजनैतिक स्वार्थ के लिए, इनका शिकार कर दिया क्यों गया?

पिछडमे और वंचितो की
वह सदा बनता रहा आवाज
नागरिको के न्याय के खातिर
लडम्ता रहता सुबह से साँझ
लक्ष्मी नारायण के लिए मुम्बई की वर्दी को सिया क्यों गया?

ठाणे शहराचे माजी पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचा पदोन्नत्ती मिळून त्यांची मुंबई शहरात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली झाली. आपल्या कार्यकाळामध्ये ठाण्यातील नागरिकांची मने जिंकलेल्या सह पोलीस आयुक्तांच्या प्रेमापोटी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक नागरिक, सामाजिक संघटना पुढे सरसावल्या होता. त्यामध्ये ठाण्यातील ‘म्यूस’ या तरुणांच्या गटाने एका कवितेच्या माध्यमातून तरुणांचा आवाज समाजासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ‘म्यूस क्लब’ने एका चित्रफितीच्या माध्यमातून ‘प्रमोशन के नाम पे ट्रान्स्फर किया क्यों किया’ ही कविता सादर करत ठाणे शहराला लाभलेल्या इतक्या चांगल्या व्यक्तीची बदली का केली, हा प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. संज्ञापन आणि पत्रकारिता शिकत असलेल्या रोशन यादवने ही कविता लिहिली आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आफवांमुळे निर्माण होणारी तरुणांच्या मानातील घालमेल या कवितेतून सादर करण्यात आली आहे. या चित्रफितीचे संपूर्ण चित्रीकरण व संकलन आदित्य डोखारे याने केले. या चित्रफितीला सोशल साइटवर हजारो सदस्यांनी पसंती दर्शवली असून व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या चाहत्यांनी या चित्रफितीचे खुपच कौतुक केले आहे.
लहानपणापासून निशांत बंगेरा याच्यावर चित्रपटांचा खूप प्रभाव होता. समाज घडवण्याची ताकद चित्रपटात आहे असे त्याला नेहमी वाटायचे. महाविद्यालयात शिकत असताना त्याने त्याचे मत विद्यार्थ्यांपुढे मांडले व जानेवारी २०१२ ला ‘म्यूस चित्रपट क्लब’ची सुरुवात केली. ‘बघा, विचार करा, विस्तार करा’ या टॅगलाइनने म्यूसची सुरुवात झाली. जनजागृती करणाऱ्या अनेक चित्रपटांच स्क्रीनिंग म्यूसच्या माध्यमातून करण्यात आले. चित्रपट संपल्यावर त्यावर चर्चा करून लोकांना सकारात्मक व योग्य विचार करण्यास भाग पडणे हा ‘म्यूस’चा मूळ हेतू आहे. आतापर्यंत ‘म्यूस’ने २० पेक्षा जास्त स्क्रीनिंग आणि चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. त्यातून समाजाला त्रास होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे निशांतला गवसली व त्या प्रश्नांवर मात करायचे असे निशांतने ठरवले. पण आपल्याला जर हे करायचे असेल तर आपण एकटय़ाने असून चालणार नाही याची जाणीव निशांतला झाली व तो एका टीमच्या शोधात निघाला. अम्रिथा मोहन, आदित्य डोखारे, हर्शल सावंत, निमेश देवालिया, ऐश्वर्या अय्यर, मंडोन्ना जॉन्सन, जोर्जे डिसोजा, सौरभ मोरे, शुभम त्रिपाठी, आदर्श प्रदीपकुमार, जोएल, समीर आणि हेमंत अशा अनेक मित्र-मैत्रिणींनी निशांतला साथ दिली व म्यूसच्या पहिल्या प्रोजेक्टला सुरुवात झाली.
‘बॅग पकड, जगह बना’
४ मार्च २०१४ ला ‘बॅग पकड जागा बना’ या नावाने म्यूसच्या पहिल्या प्रोजेक्टला सुरुवात झाली. या प्रोजेक्टसाठी म्यूस सभासदांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. लोकल ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आपली बॅग सामान ठेवण्याच्या कॅरिअरवर ठेवतात. जर बसलेल्या प्रवाशांनी आपली बॅग स्वत:कडे ठेवली तर उभे राहिलेल्या प्रवाशांना कॅरिअरवर बॅग ठेवता येईल. गर्दीतून सात बॅग जरी कॅरिअरवर ठेवण्यात आल्या तरी चार फूट जागा मोकळी होते व दररोज गर्दीमुळे रेल्वे अपघातात जीव गमावणाऱ्या लोकांची संख्या कमी होण्यात मदत होऊ शकते. ही संकल्पना म्यूस सभासदांनी लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांसाठी अजून जास्त हुक उपलब्ध करून देणे आणि स्टेशनवर उद्घोषणांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही संकल्पना पोहोचवणे ही म्यूस क्लबचा प्रयत्न आहे.
‘अ पीरिअड ऑफ शेअिरग’
‘ए पिरेड ऑफ शेअिरग’ या नावाने म्यूस च्या दुसऱ्या प्रोजेक्टची सुरुवात ऑक्टोबर २०१४ पासून करण्यात आली. स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास शालेय जीवनापासून सहन करावा लागतो. शहरात या गोष्टी बाबत चांगल्या प्रकारे जागृती असल्यामुळे त्या वेळी आवश्यक असणारे पॅड्स औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध असतात. पण ग्रामीण भागात असे दिसून येत नसल्यामुळे म्यूस क्लबने डहाणू येथील नरेशवाडी शाळा आणि निवासी शाळेतील मुलींना मोफत पॅड्स पुरवण्याचा निर्णय घेतला. मागच्या दीड वर्षांत अनेक प्रायोजकांच्या माध्यमातून म्यूसने २००० पेक्षा जास्त पॅडची पाकीट नरेशवाडी शाळा आणि होस्टेल मध्ये राहणाऱ्या तीनशे मुलींना मोफत उपलब्ध करून दिले आहेत. इतकेच नव्हे तर पॅडचे बरोबर प्रकाराने विघटन झाले नाही तर त्यातून आजारांची लागण (इन्फेक्शन) पसरू शकतात. ही गोष्ट लक्षात घेता म्यूसने सखी ट्रस्ट (गुजरात)च्या माध्यमातून त्या मुलींना इकोफ्रेंडली विघटन मशीनची व्यवस्था करून दिली आहे.
‘व्हॉइस अगेन्स्ट नॉइज’
या दोन्ही प्रोजेक्ट्स एकत्र सुरू असताना म्यूसने आपल्या तिसऱ्या प्रकल्पाची सप्टेंबर २०१५ ला ‘व्हाइस अगेन्स नॉइस’ या नावाने सुरुवात केली. गणेश विसर्जनच्या वेळी वाजणाऱ्या ढोल व स्पीकरचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक असतो. ज्यामुळे आजूबाजूच्या रुग्णालयामध्ये असणाऱ्या रुग्णांना त्याचा खूप त्रास होतो. म्यूसचे सगळे सभासद त्या दिवशी हातात पोस्टर घेऊन शांतपणे ठाण्यातील सहा मुख्य रुग्णालयांसमोर उभे राहिले. ६०% पेक्षा जास्त मंडळांनी रुग्णालयासमोर आपल्या स्पीकरचा आवाज कमी करून म्यूसच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. पुढच्या वर्षी ही मोहीम अजून मोठय़ा प्रमाणात राबवण्याचा म्यूसचा प्रयत्न आहे. म्यूस क्लबबद्दलची अधिक माहिती म्यूस ‘वॉच. थिंक. शेअर.’ या नावाने असणाऱ्या त्यांच्या औपचारिक (ऑफिशिअल) फेसबुक पेजवर आपल्याला मिळू शकते.