लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याण: टिटवाळ्यातील एका दुकान मालकाची त्याच दुकानातील नोकराने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने दोन दिवसापूर्वी कल्याण जवळील दहागावच्या जंगलात नेऊन गळा दाबून हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास करताना टिटवाळा पोलिसांनी दुकानातील नोकरदार आणि त्याच्या दोन साथीदारांना गुरुवारी अटक केली. सुनील मौर्य, अभिषेक गुप्ता, शुभम गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, टिटवाळ्यात सचिन म्हामने यांच्या पत्नीचे इनव्हर्टर, इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान आहे. या दुकानात सुनील मौर्य नोकर म्हणून काम करत होता. दुकानातून विक्री झालेल्या वस्तुंची खरेदीदाराकडून वसुलीचे काम तो करत होता. दुकानदार सचिन यांना सुनीलचे आपल्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध आहेत असा संशय होता. याविषयावरुन आणि खरेदीदारांकडील देयक वसुलीवरुन सचिन आणि सुनील यांच्यात सतत दुकानात वाद होत होते. आपले असे काही संबंध नसल्याचे सांगूनही मालक सचिन अस्वस्थ होता. या सततच्या प्रकाराने नोकर सुनील याने मालक सचिनचा काटा काढण्याचे ठरविले.
आणखी वाचा- धक्कादायक! डोंबिवलीतल्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या माणसाने पत्नीचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल
त्याने मालक सचिन यांना दहागाव मधील एका शेतघरात इनव्हर्टर बसवायचे आहेत. त्या जागेची पाहणी करुन येऊ असे बोलून मालकाला त्याच्या मोटारीतून घेऊन तो दहागाव येथे गेला. तेथे गेल्यानंतर जंगलात सुनीलचे दोन साथीदार सज्ज होते. जंगल भागात मोटार गेल्यावर सुनील आणि त्याच्या दोन साथीदारांनी सचिन यांना दुर्गम जंगलात आडबाजुला नेऊन तेथे त्याची गळा दाबून हत्या केली. तेथे त्याचा मृतदेह पुरला. मोटार तेथून काही अंतरावर तशीच टाकून ते पळून गेले.
रात्रीच्या वेळेत जंगली प्राण्यांनी मृतदेहावरची माती उकरुन काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मृतदेहाचे हात वर दिसू लागले. दहागाव भागातील नागरिकांना हे समजल्यावर त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील यांना माहिती दिली. पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. काही अंतरावर एक मोटार नासधूस केलेल्या अवस्थेत उभी होती.
पती दोन दिवस घरी आले नाहीत म्हणून सचिन यांच्या पत्नीने टिटवाळा पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरुन सचिन यांच्या खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी तपास चक्रे हलवून आरोपींना टिटवाळा परिसरातून अटक केली.