बदलापूर: अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी उल्हास नदीतून अतिरिक्त ७ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमधील पाणी योजना मार्गी लागणार आहे. तर पाणी आरक्षणामुळे रखडलेली बदलापुरातील पाणी योजना मंजूर होणार आहे. दोन्ही शहरांच्या 256 पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा यामुळे पदरात पडला आहे. आता पाणी योजना मार्गे लागल्यास या वाढीव आरक्षण मिळालेल्या पाण्याचा वापर करता येईल.

बदलापूर आणि अंबरनाथ शहराची पाणीपुरवठा व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चालवली जाते. बदलापूर शहराला उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवले जाते. अंबरनाथ शहरालाही याच पाण्यातून काही भाग दिला जातो. अंबरनाथ शहराची लोकसंख्या पाहता अंबरनाथ पालिकेचे चिखलोली धरण शहराला सहा दशलक्ष लिटर पाणी देते. तर २० दशलक्ष लिटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अंबरनाथ शहराला पुरवले जाते. बॅरेज बंधाऱ्याची क्षमता सुमारे १३० दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यातील ७० दशलक्ष लिटर पाणी बदलापूर शहराला तर उर्वरित पाणी अंबरनाथ शहराला दिले जाते. मात्र दोन्ही शहरांची वाढती पाण्याची मागणी पाहता शासनाकडून २०५६ पर्यंत पुरेल इतक्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यातील अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती मिळाली आहे. तर तांत्रिक बाबींमुळे बदलापूर शहरातील पाणी योजना रखडली होती.

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

हे ही वाचा…डोंबिवलीत घरडा सर्कल ते पेंढरकर महाविद्यालय रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहनतळ, धावणाऱ्या वाहनांसाठी एकेरी मार्गिका उपलब्ध

यामध्ये नव्याने पाणी आरक्षण ही महत्त्वाची बाब होती. गेल्या आठवड्यात जलसंपदा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला असून अंबरनाथ आणि बदलापूर शहरासह आयुध निर्माण कारखान्याला एकत्रितपणे सात दशलक्ष घनमीटर इतका वाढीव पाणीपुरवठा मंजूर केला आहे. बदलापूर शहरातील बॅरेज बंधाऱ्यातून बदलापूर शहरासाठी तर नाळिंबी येथील उल्हास नदीतून अंबरनाथ शहरासाठी ही पाणी उचल केली जाणार आहे. नव्याने मार्गी लागणाऱ्या पाणी योजनांमधून या पाण्याचा वापर करता येईल अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या वाढीव पाणी आरक्षणामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा…Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना

यापूर्वीचे पाणी कुठे अडले ?

बदलापूर शहरासाठी अतिरिक्त पाच दशलक्ष घनलिटर पाणी मंजूर करण्यात आले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे पाणी मिळणार होते. मात्र त्यातील अवघे दोन दशलक्ष लिटर पाणी सध्या मिळाले आहे. त्यामुळे उरलेले तीन दशलक्ष लिटर पाणी कुठे अडले असा प्रश्न उपस्थित होतो आहे