ठाणे : पोलीस भरतीमध्ये स्पाय इअरपिस नावाचे यंत्र वापरून काॅपी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकूण चार गुन्हे दाखल केले असून सात जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या सात जणांपैकी पाचजण हे पोलीस भरतीचे उमेदवार असून हे सर्वजण जालना, अहमदनगर आणि संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. अंतर्वस्त्रामध्ये लपवून त्यांनी हे यंत्र आणले होते अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

अर्जुन सुंदर्डे (२२, जालना), आनंदसिंह दुलत ( जालना), युवराज रजपुत (२२, संभाजीनगर), सुवर्णा पिंगारी (२५, संभाजीनगर), संदीप दुधे (३१, संभाजीनगर) अशी उमेदवारांची नावे आहेत. तर, छकुली साळवी (२०, अहमदनगर) आणि जीवन मानसिंग (२५, संभाजीनगर) अशी इतर दोघांची नावे आहेत. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. तर याप्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २०२२-२३ या वर्षासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नौपाडा, ठाणेनगर, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट येथील चार केंद्रावर लेखी परिक्षा सुरू होती. काॅपीचे प्रकार टाळण्यासाठी परिक्षा केंद्राच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी

हेही वाचा >>>वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, ७५ वर्षीय आरोपी अटकेत, अंबरनाथमध्ये संताप

असे असतानाही अर्जुन, आनंदसिंह, युवराज, सुवर्णा आणि संदीप यांनी परिक्षेमध्ये काॅपी करण्यासाठी स्पाय इअरपिस नावाचे ब्यूटूथ यंत्र लपवून परिक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे लपविलेले यंत्र आढळून आले. उमेदवारांचे नातेवाईक परिक्षा केंद्राबाहेर थांबून प्रश्नांची उत्तरे या यंत्राद्वारे देणार होते. या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर परिक्षा केंद्राबाहेरुन छकुली आणि जीवन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणांमध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात, नौपाडा येथे तिघांविरोधात, वर्तकनगर येथे दोघांविरोधात आणि वागळे इस्टेट येथे एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.