पुस्तके ही आपल्या आयुष्याची सोबती असतात. पुस्तकांना सोबत घेऊन प्रगल्भता जपण्याची आस असलेले आणि आपल्यासोबतच इतरांनाही वाचनाची गोडी लावणारे फार कमी असतात. ठाण्यातील विजय दावडा त्यापैकी एक पुस्तकप्रेमी. ज्यांनी आपल्या तरुण वयात अनेक पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर घातली. पण ज्ञान दिल्याने वाढते. या उक्तीप्रमाणे त्यांनी नेहमीच आपल्या जवळील पुस्तकांचा समाजातील इतर shabda-insideलोकांनाही उपयोग व्हावा, यासाठी प्रयत्न केला. वाचनप्रेमापोटी दावडा यांनी सुरुवातीला आपल्या वडिलांकडून ५१ रुपये घेऊन २५ पुस्तके खरेदी केली. ५० पैसे वाचनमूल्य आणि दोन रुपये अनामत रक्कम घेऊन १९८० मध्ये यांनी जॉली ग्रंथालयाची स्थापना झाली. अनेक पुस्तक प्रदर्शनाना भेट देऊन ते वाचकांच्या आवडीचे निरीक्षण करत. त्यानुसार त्यांनी ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी केली. आता ३५ वर्षांनंतर त्यांच्या ग्रंथालयात तब्बल २० हजार पुस्तके आहेत. खोपट परिसरात महापालिकेने दिलेल्या जागेत ग्रंथालयाचा कारभार सुरू झाला. सुरुवातीला वीजपुरवठाही नव्हता. त्यामुळे एक वर्षभर मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी ग्रंथालयाचा कारभार चालविला. त्या संपूर्ण भागातच वीज नसल्याने वाचकांची येण्या-जाण्याची गैरसोय होत होती. त्यावेळी या वाचनप्रेमी गृहस्थाने ग्रंथालयाच्या रस्त्यावर मेणबत्त्या लावून ग्रंथसेवा पुरवली. आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचा संग्रह आहे. ग्रंथालयात प्रवेश केल्यानंतर आपल्या सभोवताली अनेक मराठी, इंग्रजी, हिंदी साहित्यिकांची नावे रकान्यात दिसतात. आपल्याला हव्या असलेल्या साहित्यिकांच्या शोधात आपण गेलो की त्या साहित्यिकाच्या नावापुढे त्यांची अनेक पुस्तके आपल्या दृष्टीस पडतात. ग्रंथालयातील पुस्तके चाळून आपल्याला हवे असलेले पुस्तक निवडण्याची मुभा इथे आहे. अरुण ताम्हनकर, इंद्रायणी सावकार, देवदत्त पाटील, भालचंद्र नेमाडे, अगाथा ख्रिस्ती अशा अनेक साहित्यिकांची पुस्तके दिसतात.

पुस्तकांची देखभाल

नवीन आलेल्या प्रत्येक पुस्तकाला दावडा स्वत: कव्हर घालतात. शिवाय पुस्तक जुने झाल्यावर पुस्तकाचे पहिले आणि शेवटचे पान फाटू नये, यासाठी पुस्तकांच्या दोन्ही बाजूला सफेद कागद लावलेला असून प्रत्येक पुस्तक शिवून ठेवलेले आहे. इतक्या वर्षांपासून पुस्तकांचा संग्रह असल्याने अनेक दुर्मीळ पुस्तके ग्रंथालयात

आहेत. इतरत्र अभावानेच आढळणारी वर्ल्ड फेमसचे प्रकाशन असलेली काही पुस्तके या ग्रंथालयात आहेत. नवी दिल्लीत त्यातील अवघी पाच पुस्तके आहेत. त्यानंतर ती  येथे आहेत. गुलशन नंदा यांची चंदन, पालेखा यांसारखी अनेक पुस्तके जी मुंबईतील ग्रंथालयातही सापडणार नाहीत, ती इथे उपलब्ध आहेत. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना वाचण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा भरणा इथे आहे. अगदी चार वर्षांच्या मुलालाही वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकाशनाच्या चित्रांसोबत कथा असलेली पुस्तके, लहान मुलांना आवडतील असे (टेल कलेक्शन) (स्लिपिंग ब्युटी) हे दुर्मीळ पुस्तक, ळ्रल्ल३्रल्ल अल्ल िळँी ढ्रूं१२, अ२३ी१्रू२ अल्ल िरल्ल,इ‘ ढं’ूंीों्र१८ असे  निरनिराळे कॉमिक्स ग्रंथालयात पहायला मिळतात.

हर्लन कोबेन, जॉन रोस, डेविड मोरेल अशी इंग्रजी साहित्यिकांचे वाङमयही येथे  आहे. इंग्रजीमध्ये रहस्यमय, थरारक कथांकडे वाचकांचा जास्त कल दिसतो तर लहान मुलांना जेर्निमो स्टील्ट्नचे कथासंग्रह वाचायला आवडतात. केवळ कथा, कादंबऱ्या अशाच धाटणीची पुस्तके इथे नाहीत तर खऱ्या अर्थाने जी पुस्तके वाचल्यावर आपल्या ज्ञानात भर पडेल अशा पुस्तकांचा संग्रह ग्रंथालयात आहे. खाद्यपदार्थ, स्पर्धात्मक परीक्षा, व्यवसाय अशा वेगवेगळ्या विषयांवरील मासिकेही कव्हर लावून ठेवलेली आहेत. बहुतेक ग्रंथालयात हिंदी पुस्तके फार कमी असतात. इथे मात्र हिंदी वाचकांसाठी वेद प्रकाश शर्मा,अनिल मोहन, केशव पंडित, प्रेमचंद अशा हिंदी साहित्यिकांची पुस्तके वाचण्यास उपलब्ध आहेत.

गेली ३५ वर्षे विजय दावडा ग्रंथालयाचा कारभार एकटेच सांभाळत आहेत. तरीही ग्रंथालयात गेल्यावर कुठेही पुस्तकांची अडगळ आपल्याला दिसणार नाही. उलट प्रत्येक पुस्तक जागच्या जागी मांडलेले दिसेल. आजही विजय दावडा पुस्तकांच्या खरेदीसाठी ठिकठिकाणी फिरतात. वर्तमानपत्रात पुस्तकांचे समीक्षण वाचून पुस्तके खरेदी करतात.ग्रंथालयातील अनेक जुनी झालेली कॉमिक्स वितरकांना देऊन त्यांची पुन्हा छापणी केली जाते. जागा लहान असली तरी या ग्रंथालयातील पुस्तकांचा संग्रह ग्रंथालयाला मोठे करतो. श्रीमंत बनण्यासाठी नाही तर आपुलकीने ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी ग्रंथालय असावे, असे विजय दावडा यांचे मत आहे. या ग्रंथालयात आपुलकीचे वातावरण आणि नवीन जुन्या पुस्तकांचे भांडार असल्यामुळे अगदी बोरिवलीहून काही वाचक सभासद पुस्तके वाचण्यासाठी येतात.

या ग्रंथालयात आल्यावर आपल्याला हवे ते पुस्तक लगेच उपलब्ध करून दिले जाते. पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी, काही माहिती देण्यासाठी विजय दावडा नेहमीच मदतीला तत्पर असतात. असे ग्रंथालयाचे ज्येष्ठ सभासद शरद उपलप कौतुकाने सांगतात. एकंदरीतच काही वेगळे, जुने, नवीन वाचनाचा अनुभव घ्यायचा असेल तर जॉली ग्रंथालयाच्या या पुस्तकांची सफर एकदा करायलाच हवी.