ठाणे: कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवतील. तर ठाणे लोकसभेसह राज्यातील इतर मतदार संघातून महायुतीतील कोणता पक्ष निवडणूक लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीत महायुती २०० पेक्षा जागा जिंकेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मंगळवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि इतर नऊ पक्षांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे करतात. या मतदार संघातून तेच आगामी निवडणूक लढविणार असून त्यास भाजपची संमती आहे.

हेही वाचा… कल्याणमध्ये अखंड वाचनयज्ञ; दहा हजारहून अधिक वाचक आणि रसिकांचा सहभाग

परंतु ठाणे लोकसभा मतदार संघासह राज्यातील इतर जागा महायुतीतील कोणत्या पक्षाने लढवावी याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत असे देसाई म्हणाले. तसेच २०२४ मध्ये विधानसभा निवडणूकांमध्ये २०० पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा… मोदकोत्सव स्पर्धेत वैविध्यपुर्ण मोदकांची मेजवानी

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भाचा चौकशी अहवाल लवकरच येणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही देसाई म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai informed that cm eknath shinde and dcm devendra fadnavis will decide thane lok sabha seat dvr