ठाणे: निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेण्याऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने बुधवारी ठाण्यात अनोखे आंदोलन केले. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत राष्ट्रवादी (शरद पवार गट) विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सामान्य नागरिकांची एकूण दहा हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविली. यामध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास मतदान यंत्र (ईव्हीएम) बाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी (शरद पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. राष्ट्रवादी (शरद पवार गट) विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. ” सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा”, अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा यावेळी देण्यात आला.

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Elderly man murdered
Crime News : लग्नाचे आश्वासन, सोन्याचे दागिने अन्… ७२ वर्षांच्या वृद्धाबरोबर रायगडमध्ये काय घडले? मुंबईतील जोडप्याला हत्येच्या आरोपाखाली अटक
Ramdas Athawale demands ministership
Dvendra Fadnavis : “मंत्रीमंडळात आरपीएयचा मंत्री…”, रामदास आठवलेंची मोठी मागणी; अमित शाह म्हणाले…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Story img Loader