राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. ते बुधवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. अण्णा हजारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या पवारांनी आपण अण्णा हजारे यांच्याविरुद्ध खटला भरण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले. त्यासाठी मी कायदेशीर सल्ला घेत असून अण्णा हजारे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी आणि दिवाणी खटला दाखल करण्याचा माझा विचार आहे. अण्णा हजारे हे ज्येष्ठ समाजसेवक असले तरी त्यांनी कोणाविरूद्ध काहीही बोलणे हे योग्य नव्हे. यानिमित्ताने अण्णा हजारे यांनी स्वत:हून मला कायदेशीर लढाई लढण्याची संधी दिली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा