डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर मैदानात रविवारी सकाळपासून श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक याठिकाणी येणार असल्याने वाहतूक विभागाने शिळफाटा रस्त्यावरील जड, अवजड वाहतूक रविवारी (ता.२५) सकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रस्त्यावरून जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना केल्या आहेत. हलकी वाहने फक्त या रस्त्यावरून सुरू राहणार आहेत. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भातची अधिसूचना शनिवारी प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

प्रवेश बंद व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

मुंब्रा, कल्याण फाटा येथून कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने मुंब्रा वळण रस्ता, खारेगाव येथून मुंबई-नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील. भिवंडी, दुर्गाडी येथून पत्रीपूल मार्गे शिळफाटा दिशेने जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने दुर्गाडी चौकातून खडकपाडा मार्गे इच्छित स्थळी जातील. वालधुनी चौकातून आनंद दिघे पुलावरून जाणाऱ्या जड वाहनांना वालधुनी चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने उल्हासनगर सुभाष चौकमार्गे जातील.

हेही वाचा – “छत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुस्लिमांची मतं…”, शरद पवार रायगडावर गेल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

विठ्ठलवाडी, श्रीराम चौकमार्गे कोळसेवाडीकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना श्रीराम चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ मार्गे जातील. नेवाळी नाका येथून कोळसेवाडी भागात जाणाऱ्या जड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद. ही वाहने बदलापूर, अंबरनाथमार्गे जातील. तळोजा निसर्ग ढाबा खोणी मार्गे जाणाऱ्या जड वाहनांना खोणी निसर्ग ढाबा येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने बदलापूर, अंबरनाथ, काटई बदलापूर चौक, लोढा पलावा कल्याण फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpata road closed for heavy vehicles on sunday decision of traffic department for balaji festival at premier maidan ssb
Show comments