ठाणे : काल इतक्या घाई घाईत मतांसाठी जैन मुनींना भेटायला गेले! दिघे साहेबांचे समाधीस्थळ मात्र लक्षात नाही राहिले. उद्धवजी, समाधी शिंदे साहेबांनी बांधली म्हणून तिथे तुमची पावले नाही वळली की बाळासाहेबांचे स्मारक अजून करू शकलो नाही, याची लाज वाटली? अशी टिका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने ठाकरे गटाकडून ठाण्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्धव ठाकरे हे त्यानंतर दिघे यांच्या टेंभीनाका येथील स्मारकाला अभिवादन करून जैन धर्मियांच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. आनंद दिघे यांचे समाधीस्थळ ठाण्यात बांधण्यात आले. या समाधीस्थळी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आल्यानंतरही त्यांनी तिथे भेट दिली नसल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group spokesperson naresh mhaske criticize uddhav thackeray over anand dighe mausoleum in thane ssb