ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह गाणे आणि विधान केल्याप्रकरणी आता पडसद उमटू लागले आहेत. कामरा याच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत असून नरेश म्हस्के यांनी तर कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे.
स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणे केले आहे. समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरायला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडीयन, तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला तर भारी पडेल असे म्हस्के म्हणाले. यांनतर म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. म्हस्के म्हणाले, संजय राऊत तुमच्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिम्मत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या… तुम्ही हे काय भाडोत्री या विदूषकांकडून एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायला लावतात.
त्यांनतर ते पुढे म्हणाले कुणाल कामरा आपण भारतात फिरू शकत नाही. काही पैशांसाठी `उबाठा`चे हत्यार बनू नका. मला आमचा शिवसैनिक आहे ना बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही असे म्हस्के म्हणाले.