डोंंबिवली : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून डोंबिवली विधानसभेच्या उमेदवारीसाठी विचार न झाल्याने नाराज झालेले ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी गेल्या महिन्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दिला होता. या घटनेनंतर थरवळ कोणत्या पक्षाची वाट धरणार याविषयीची उत्सुकता असतानाच, विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी थरवळ यांनी भाजपची वाट धरून डोंबिवली विधानसभेतील भाजप नेते व उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांना समर्थन जाहीर केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रविवारच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी समाज माध्यमातून एक अनावृत्त पत्र शिवसेनाप्रमुखांना लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करत असताना, त्यांनी ठाकरे गटात घडत असलेल्या घटनांमुळे व्यथित होऊन आपण विकास, विचारधारेचा विचार करून भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना समर्थन देत असल्याचे म्हटले आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

हे ही वाचा… कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले

दीड वर्षापूर्वी मुंबई-गोवा महामार्गालगत महाड परिसरातील एका रस्त्याचे काम अनेक वर्ष रखडले होते. महाडचे मूळ निवासी सदानंद थरवळ यांच्या मागणीनंतर मंत्री चव्हाण यांनी या रस्ते कामासाठी ११२ कोटीचा निधी दिला होता. तेव्हापासून मंत्री चव्हाण, थरवळ यांचे सूत अधिक जुळले होते.

अनावृत्तपत्रात म्हटले आहे, आपले आणि आनंद दिघे यांचे आम्ही निष्ठावान शिवसैनिक. श्वासाची माळ तुटली. ध्यासाची नव्हे. ध्यास घेतलेली आम्हा शिवसैनिकांची कट्टर पीढी. आम्हा सामान्य निष्ठावान शिवसैनिकांना आपण पुढे येण्याची संधी दिली. शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी मानाची पदे दिली. त्यामुळे शिवसेनेतील ४४ वर्षाचा प्रवास संघटनेमध्ये कधी सरला ते समजले नाही.

डोंबिवली विधानसभा मतदारसंंघात नेतृत्व करण्याची सामान्य शिवसैनिकाला संधी आली, तेव्हा एकनिष्ठ, सामाजिक कार्यापेक्षा स्वार्थी राजकारण, धनशक्ती प्रभावी ठरली. या प्रवृत्तीला डोंबिवलीकरांनी कधीच हद्दपार केले आहे याचा वरिष्ठांना विसर पडला. शिवसेनेत अनेक स्थित्यंतरे घडली. आमच्या निष्ठा नेहमीच मातोश्रीशी कायम राहिल्या, असे थरवळ यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: ‘माझा दादा मुख्यमंत्री व्हावा’, अजित पवारांच्या बहिणीची इच्छा

डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी. सामान्य, मध्यवर्गियांचे शहर. मागच्या अनेक वर्षात या शहराने नेहमीच शिवसेना-भाजप महायुतीला साथ दिली. आम्हा शिवसैनिकांना भाजप, संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. डोंबिवलीची सांस्कृतिक परंपरा जपणारा आणि विकासाची निधी आणू शकणाऱ्या लोकप्रतिनिधीची या शहराला गरज आहे. जो उमेदवार विचारधारेशी एकनिष्ठ राहतो, तोच जनतेशी प्रामाणिक राहू शकतो. सोयीनुसार विचारधारा बदलणारे नेहमीच स्वार्थात मशगुल असतात. त्यामुळे हा विचार करून आपण भाजपला समर्थन देत आहोत, असे थरवळ यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

डोंबिवलीची सांस्कृतिक प्रतिमा जपणाऱ्या, विचारधारेशी एकनिष्ठ राहणाऱ्या, शहर विकासासाठी निधी आणणाऱ्या लोकप्रतिनिधीची शहराला गरज आहे. हा विचार करून आपण भाजपला समर्थन दिले आहे. – सदानंद थरवळ, ज्येष्ठ शिवसैनिक

ज्यांनी ठाकरे पक्षातून राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतंत्रपणे काही निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. – अभिजीत सावंत, ठाकरे गट शहरप्रमुख, डोंबिवली.