डोंबिवली : कडक उन्हाळा सुरू झाल्यापासून डोंबिवली शहराच्या विविध भागात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दोन ते तीन चार तास वीज पुरवठा पूर्ववत होत नसल्याने नागरिकांची हैराण होत आहे. हे अघोषित वीज भारनियमन तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाच्या उपस्थितीत केली. कडक उन्हाळ्यामुळे अनेक आजार, साथरोग निर्माण झाले आहेत. घरात ज्येष्ठ, वृध्द, लहान बाळे असतात. आजारी रुग्ण असतात. त्यांना घरात वीज पुरवठा नसेल तर सर्वाधिक त्रास होतो. या बाबींचा विचार करुन कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली परिसरात अघोषित भारनियमन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख थरवळ यांनी अधिकाऱ्यांना केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा