राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहतात. त्यांना कामानिमित्ताने भेटण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार आले तर त्यांना तुम्ही काळे झेंडे दाखविणार का, आणि दिवाळीचे कार्यक्रम करायचे नाही का, अशा कार्यक्रमांवर बहिष्कार घालून आपल्यालाआरक्षण मिळणार आहे का असे अनेक प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी मराठा नेत्यांच्या शिष्टमंडाळापुढे लावली. या दरम्यान, त्यांची शाब्दीक चकमक झाली.
हेही वाचा >>> घोडबंदर मार्गावर मध्यरात्री अवजड वाहतुकीला बंदी
ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींसह, राजकीय नेते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. यासंदर्भात समाजाच्या शिष्ट मंडळाने टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. या पत्रात लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांना जिल्हाबंदी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून म्हस्के यांनी काही प्रश्न उपस्थित केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाला कायम विरोध केला. मनोज जरांगे यांनी आरक्षणासंदर्भात केलेली मागणी आव्हाड यांना मान्य आहे का, तसेच ते शहराबाहेरचे म्हणजेच, कळवा-मुंब्राचे आमदार आहेत. त्यांना तुम्ही व्यासपीठावर कसे घेतले, त्याचबरोबर खासदार राजन विचारे यांनाही व्यासपीठावर कसे घेतले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ऐकीकडे या दोन्ही नेत्यांना व्यासपीठावर घेता आणि दुसरीकडे इतर नेत्यांना जिल्हा बंदी घालता हे योग्य नाही. सर्वांसाठी एकच नियम ठेवा असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक
तुम्ही राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी लागू केली आहे. परंतु तुम्ही सुद्धा राजकीय पक्षाचे नेते आहात. तुमच्याकडेही भाजपची पदे आहेत. तुमच्या पक्षाचाही ११ नोव्हेंबरला कार्यक्रम होणार आहे. त्याबाबत तुमची काय भूमिका असेल. तुम्ही पक्षाचा राजिनामा देणार आहात का अशी विचारणा त्यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहतात. त्यांना कामानिमित्ताने भेटण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार आले तर त्यांना तुम्ही काळे झेंडे दाखविणार का, आणि दिवाळीचे कार्यक्रम करायचे नाही का, अशा कार्यक्रमांवर बहिष्कार घालून आपल्यालाआरक्षण मिळणार आहे का असे अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी लावली. आम्ही पक्षाचे पदाधिकारी असलो. तरी समाज आमच्यासाठी प्रथम आहे. आम्ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना पत्र देण्यासाठी गेलो होतो. परंतु त्यांनी आम्हाला म्हणणे मांडू दिले नाही. त्यांनी राजकारणाची भाषा केली. ठाण्यात मराठा बांधव उपोषणाला बसले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे व्यासपीठावर कसे असा प्रश्न विचारणाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट का घेतली नाही. – सचिन पाटील, पदाधिकारी, सकल मराठा समाज.